Breaking News

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा अवघे तीन वर्षांचे असतांनाचं दादांचे वडिल तबाजी कर्डक यांचे निधन झाले. त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक व थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादा व लहान बहीण सावित्रीबाई लहान असल्याने सर्व काही आई व बंधू भागवायचे तशी घरची १८ एकर जमीन होती, तिथं कधी पिकायच तर काही काळ धकुन जात असे. मग आईला रानात लाकडे वगैरे गोळा करून मोळ्या बांधून घेऊन त्या काही मैल पायी चालून देशवंडी ते सिन्नर पायपीट करत यावे लागत असे त्याचे ७-८ आणे मिळाल्यावर २-३  आण्याच्या भाकरी आणाव्या लागत असे व आपल्या पोटाची खळगी भरावी लागत असे..!!
नंतर बालवयातला वामन घरची गुरं-ढोरं चारु लागला, घरी ही मदत करत असे. गावात जातीयतेचे वातावरण गंभीर होतेच, त्यात हे सारं करत असतांना दादा व परजातीचे गुरे लागणारी मुले सुरपारंबी, विटीदांडू, आट्यापाट्या सारखी  खेळ जोमाने खेळायचे नंतर कालांतराने प्रापंचिक खर्च वाढू लागल्याने वामनदादांच्या थोरल्या बंधूनी मुंबई गाठली, काही कामधंदा करित असतांनाच त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली. नोकरी लागताच काही दिवसांनी सर्वांना सदाशिव कर्डक यांनी मुंबईला बोलावून घेतलं तिथे मग वामनदादा कर्डक आईला मदत म्हणून रोहयोचे काम करु लागले. नंतर दादांना रेल्वेत नोकरी मिळाली होती, तिथं एक महिन्याचा पगार न् घेता सोडली. काही दिवसांनी हिंदुस्थान अनलिव्हर लि.मुंबई ला नोकरी मिळाली ती ही काही दिवसात पगार न् घेताच सोडली. त्यानंतर ही तिसरी नोकरी नाशिक नोटप्रेस ला मिळाली, ती ही सोडली मग जे मिळेल ते ते करत होते कधी आइस्क्रीम विकणे तर कधी रेल्वेखाणीत कोळसा वेचणे असे काही कामधंदे करत असतांना दादांना जवळचं लेझीम पथकात लेझीम शिकवायचे काम मिळाले. ते करत असताना एकदा एक माणूस असाच पत्रं वाचून घेण्यासाठी याला-त्याला विनवणी करत तो अखेर दादांच्या जवळ आला व म्हणाला की भाऊ एवढं माझं पत्र वाचून द्या की, परंतु वामनदादांना लिहता वाचता येत असल्याने ते त्या माणसावर चिडले व म्हणाले मी काय करतोय दिसत नाही का? त्यावर तो इसम माफी मागून निघून गेला ..!!
त्या गोष्टीचा दादा पस्तावाकरीत जवळचं शाळा असलेल्या ठिकाणी देहलवी नावाच्या एका इस्लामी प्राध्यापकांसमोर बसून रडू लागले. त्यावर प्राध्यापक दादाला म्हणाले की अरे कर्डक तुम तो रो रहे हो, क्युँ क्या बात है ? त्यावर दादा म्हणाले सर मुझे पढ़ना लिखना नहीं आता ..!!
सरांनी हसत-हसत उसमे रोनेवाली क्या बात है बझार से अंकलिपी लो बाराह बार लिखो और पढ़ो जल्दी सिख जाओगे. त्यातच घरी दादा धावत गेले आई कडून पैसे घेवून २ रु.अंकलिपी घेतली सरांनी सांगितलेल्या प्रमाणे केले व सरांना लिहून वाचून दाखवले. सरांना ही आनंद झाला, नंतर दादा दुकानावरिल इंग्रजी मराठी पाट्यावरील जोडाक्षरे वाचू लागले व अर्थ समजून घ्यायला लागले, अशातच विविध चळवळी चालू असताना त्यावेळचे सुप्रसिद्ध चित्रपट कथा लेखक व गीतकार प्रदीप यांचं  “आज कितने दिनोंसे हमको गुलाम करके पुकारा है ” “दुर हटो ये दुनियावालो ये हिंदुस्थान हमारा है ” या गीताचे विडंबन केले  “आज कितने दिनोंसे हमको अच्छुत करके पुकारा है ” “दुर हटो ये कॉंग्रेसवालो ये हिंदुस्थान हमारा है “
हे विडंबन गीत दादांनी चाळीतल्या सर्व लोकांना ऐकवले टाळ्यांचा कडकडाट झाला व दादांना वाटलं की मी आता कवी झालो. तिथून पुढे दादांचे लिखान चालू झाले. दादांची प्रथम पत्नी अनुसया हिस दादांचे हे क्षेत्र आवडत नसे ती सारखी दुसरं काही बघा म्हणत असे, पण दादा ही ऐकत नव्हते. त्यावेळी दादांना एक मुलगी [ मीरा  ] झालेली होती, व्यवस्थित रोजगार नसल्याने परिस्थिती ला कंटाळून अनुसया मीराला घेवून निघून गेली. काही दिवसांनी दादा पत्नी अनुसयाला व मीराला घेवून आले. परंतु काही महिने थांबून परत अनुसया मीराला घेवून निघून गेली ती कायमचीचं. मग दादांचे मन काही रमेना दादा पत्नी अनुसयाकडे शेवटचं विचारायला सासरी गेले. पण पत्नी यायला तयार नाही म्हटल्यावर दादा फक्त मीराला घेवून आले व आईकडे संभाळायला दिले. नंतर परिस्थिती अभावी व उपासमारीने मीरा जगू शकली नाही. तेव्हा दादा एक छोटासा कार्यक्रम करत होते. नंतरच्या काळात दादांना तीनदा टिबी झाला. त्यातून एकदा नाशिककरांनी एकदा मालेगांवकरांनी एकदा आयु.दादासाहेब रुपवते अहमदनगर यांनी वाचवले. नंतर दादांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेजवर अनेकदा कार्यक्रम मिळाले. औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजचे काम चालू असताना बाबासाहेब यांच्या डोक्यावर छत्री धरायचे ही काही दिवस काम केले व नंतरच्या काळात दादांचे शांताबाईशी लग्न झाले त्यांनी दादांना खुप साथ दिली. मुल-बाळ न् झाल्याने व शांताबाई यांना दमा असल्याने चिडचिडी करत होत्या. मग शांताबाई यांची लहान बहीण राजूबाई वारल्यावर तीचा मुलगा रविंद्र हा दत्तक घेतला व नावं दिले…!!
दादांचे लिखान चालू होते गायन ही चालू होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्यात त्यांनी सहभाग घेतला, आंबेडकरी चळवळी मध्ये दादांचा सहभाग होताचं..!!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची महती सांगणाऱ्या गीतात दादा लिहितात :

मुंबई आमची थोरं महाराष्ट्राची पोरं, मुंबई वरती हक्क सांगती कोण कुठले चोर.  बिजं लेवुनी न्यारी-न्यारी नटली जणू का ? नवरी, आकाश सुद्धा पाहून लाजेल आमची मुंबई नगरी  लागे नजर दिसे सुंदर फुलली नवती म्हणून भवती, घिरट्या घालतीवरच्यावर..!!

मुंबईच्या रस्त्यावरती प्राणांच्या दिल्या आहुती,  रक्त सांडले वामन संगीनीला छाती, गेले ते नर झाले अमर त्या नरांची व्हा दरांची, परंपरा ही आमची थोरं..!!

दलित चळवळीविषयी दादा लिहितात :

चालवेना मार्ग फोड आले पाया , ये गं भिमाई मला उचलून घ्याया..!!

आई तुझ्या छायेत वाढला हा पिंड,मायेच्या पंखाखाली राहिलो अखंड, कशी एकाएकी तोडलीस माया..!!

कुणी साथ ना दे कुणी हात ना दे, उचलूनी मजला आपल्या कुशीमध्ये ना घे, थकलाय वामन आता शिनली ही काया..!!
हर एक नेता भाग्यविधाता जरी तुम्हाला वाटे संघटनेचे तुकडे-तुकडे करती हेचं करंटे, भासवती आम्हाला हेचं करवंदीचे काटे..!!

नवे-नवे हे नेते नवपथांचे निर्मिते, मोडतोड करणारे नवग्रंथाचे निर्मिते, एकपथाने कुठले जाणे फुटले सारे फाटे रे दादा..!!

वामन तु राहून दक्ष पूरवुन हमेशा लक्ष, कर भक्कम आता तू एक विरोधी पक्ष, सोड हे सारे कलडणारे लोटे…!!!
वेश खादीचा घेवून असा हा, देश दुःखात लोटू नकारे, सुख आपुल्या घरी आणतांना, गळे कोणाचे घोटू नका रे….!!

बिना कफनाचा वामन बिचारा, गाडला काल खाचर करुनी, भेटले छान झाले इथे पण, पुन्हा म्हसणात भेटू नका रे..!!

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीत
बंधू रं शिपाया तू दे रं दे रुपाया, चोळीच्या खणाला रं होळीच्या सणाला..!!
कधी कुठे ही झुकली नाही महाराष्ट्राची मान, महाराष्ट्राचा मर्द मराठा होता असा महान…!!
नको घाबरु नको थरथरु, गडे माय मी तूझं लेकरु..!!

तूला पाहतांना मला भास होई, उभी माझी आईच आहे जिजाई, तुझे शील डागून तुडवील पायी, आई हा शिवाजी असा निच नाही, तुला स्पर्श माते कसा गं करु..!!

आम्ही रामदासी हे महाराष्ट्र वासी,नितीने राहतो भितो पातकाशी, म्हणे आज वामन अगे मायं काशी, तुकोबाची वाणी ही तारी आम्हासी,असे थोर आहेत माझे गुरु..!!
शिवरायाच्या ये छायेखाली मुळीचं नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान..!!

लोकगीत

मीचं माझ्या सासरी पहाटे उठून, घुसळून ताक लोणी काढत होते मायं गं..!!
सांगा या वाडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला..!!
असे एकापेक्षा एक चित्रपट, लोकगीते, बुद्ध-कबीर-शिवाजी-फूले-शाहू-आंबेडकरी गीते ही १५००० च्यावर लिहिणारे व बाबासाहेबांचा सहवास व स्पर्श जपणारे युगकवि वामनदादा कर्डक यांच्या जन्मदिनानिमित्त त्रिवार अभिवादन..!!  त्यांनी १५ मे २००४ रोजी अखेरचा श्वास घेतला.
लेखन-

आयु. रविंद्र वामनदादा कर्डक व परिवार नाशिक.

९४२०६८१९८९

नव्या दमाच्या होतकरू गायकांकडून ऐका वामनदादांच गीत, संध्याकाळी होणार रिलीज

यल्गार टीमची खास पेशकश

ब्रिटिशांच्या जुल्मी सत्तेतून आपण स्वातंत्र्य मिळवलं.पण एका जल्मी सत्तेने आपल्याला हजारो वर्षापासून गुलामीत ठेवलं आहे ,

जी आपल्याला माणूस म्हणू जगू देत नाहीये , आपल्या मेंदूचा वापर करू देत नाही , आपल्या जाणीवा नेणीवावर कब्जा करून आपल्याला हिसंक यंत्र बनवू पाहत आहे . आहो ती सत्ता मानवतेची दुश्मन आहे, अज्ञानाचा अंधकार आहे , शोषणाचा पूर आहे,

चला या सत्ते विरुद्ध बंड पुकारू या,,,,महाकवी चे शब्द शस्त्र सोबत घेऊन महामानवाचे विचार धन घेऊन .

आज सायंकाळी ७ ०० वाजता , Yalgaar YouTube पूर्ण गीत घेऊन ये आहोत

जात पाळणारा घात पाळणारा || महाकवी वामनदादा कर्डक || टीजर || Yalgaar ||

Check Also

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची फि सरकारने भरावी, एकच फि राज्यभरात लागू करा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने २७ जुलै रोजी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *