Breaking News

“फ्लाईंग सिख” यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार बॉलीवूड सेलिब्रेटीसह अनेकांकडून आदरांजली

चंदीगड: वृत्तसंस्था/ प्रतिनिधी

आपल्या धावण्याच्याबळावर किमान काही काळ तरी भारत-पाकिस्तान मधील तणावाचे संबध तणावविरहीत करण्याची किमया साधणारे फ्लाईंग सिख अर्थात जीव मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे काल शुक्रवारी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चारच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे निधन झाले. त्यानंतर बरोबर ५ व्या दिवशी मिल्खा सिंग यांचे निधन झाले. निर्मल कौर या राष्ट्रीय व्हॉलीबॉल टीमच्या कॅप्टन होत्या. कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४०० मीटरच्या धावण्यात गोल्ड मेडल मिळविणारे मिल्खा सिंग हे पहिले भारतीय धावपटू होते. त्यानंतर ऑल्मपिक गेममध्ये थोडक्यात मेडल मिळविण्यापासून दूर झाले. मिल्खा सिंग यांनी १९५६, १९६०, १९६४ या वर्षात आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व केले. तसेच त्यांनी एशियन स्पर्धेत चारवेळा सुवर्ण पदकाची कमाई करून दिली.

मिल्खा सिंग यांचा जन्म पाकिस्तानात झाला. त्यानंतर झालेल्या भारत-पाक फाळणीमुळे त्यांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतीय लष्कारात नोकरी मिळाली. पुढे धावपटू म्हणून भारताला सुवर्ण पदक मिळवून देत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.

पाकिस्तानात एशियन खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिल्खा सिंग यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी धावण्याची स्पर्धा पाहण्यासाठी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आयुब खान उपस्थित होते. त्यांनी मिल्खा सिंग यांचे कौशल्य पहात मिल्खा तुम्ही फक्त पळत नव्हतात तर पक्षाप्रमाणे उडत होतात. त्यामुळे मी आपल्याला फ्लाईंग सिख अशी उपाधी देत असल्याचे जाहिर करत असल्याचे अयुब खान यांनी जाहिर केले.

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे १८ जून रोजी निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३ मध्ये मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट देखील ठरला होता. पण या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी केवळ एक रुपया मानधनापोटी घेतले होते.

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते. बऱ्याचदा अनेक प्रसिद्ध व्यक्ती हे बायोपिकसाठी कोट्यावधी रुपये मानधनापोटी घेतात. पण राकेश यांचा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरला. मिल्खा सिंग यांनी चित्रपटासाठी केवळ १ रुपया मानधनापोटी घेतला होता. ही एक रुपयाची नोट १९५८ सालची होती. याच वर्षी कॉमनवेल्थ स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी पहिले सुवर्ण पदक पटकावले होते.

दरम्यान, मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमधील अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *