Breaking News

चाकरमान्यानों, शिमग्यासाठी कोकणात जाताय तर हे वाचा ! रत्नागिरी जिल्हाधिक्यांकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

गणेशोत्सवानंतर कोकणातील शिमगा अर्थात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आता या शिमगा सणावर मार्गदर्शक तत्वांची संक्रात आली असून हा सण साजरा करण्याच्या अनुशंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबतचे आदेश लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून देण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार होळी अर्थात शिमगा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत चाकरमानी मुंबईकर कोकणात येण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना होम क्वारंटाईन आणि आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रामदेवतेची पालखी सोहळा निमित्त पालखी सजविणे बंधनकारक करण्यात असून पालखींच्या भेटी करण्यासाठी फक्त २५ लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यातील २५ जणांची आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणी करून त्याचा अहवाल निगेटीव्ह असणे आवश्यक आहे.

भेटीसाठी पालखी नेताना शक्यतो वाहनाचा वापर करावा असे सूचविण्यात आले असून ते शक्य नसेल तर पायी जाताना ५० व्यक्तींहून अधिक व्यक्ती पालखी सोबत असू नये असे बंधन घालण्यात आले आहे. त्याचबरोबर दर्शनाच्या वेळाही निर्धारीत करण्याचे बंधन विश्वस्त, गांवकरी मंडळासह जबाबदार व्यक्तींवर बंधनकारक करण्यात आले आहे. सणाच्या दिवशी पालखीची पुजा, नवस, पेढे, हार, नारळ, इत्यादी पेढे स्विकारू नयेत असे आदेशही बजाविण्यात आले आहेत.

याशिवाय कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या त्रिसुत्रीचे अर्थात मास्क वापरणे, हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आणि योग्य अंतर राखणे ही आवश्यक करण्यात आले असून रंग खेळणे, उधळणे टाळावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

Check Also

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *