Breaking News

किरीट सोमय्या स्थानबद्ध तर फडणवीसांचा इशारा कोल्हापूर दौऱ्याच्या आधीच पोलिसांकडून कारवाई

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा जाहिर आरोप करणाऱ्या आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले. विशेष म्हणजे ते उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणा होते. तत्पूर्वीच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

या कारवाईसंदर्भात किरीट सोमय्या यांनी माझा कोल्हापूर दौरा थाबविण्यासाठी आणि मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा दाबण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला.

ट्विटरवरून सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत रहात असलेल्या इमारतीच्या खाली पोलिस फौजफाटा दाखवित ठाकरे सरकारची दडपशाही माझ्या घराच्या खाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती देत जरी सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकार विरूध्द आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा दिला.

सोमय्यांच्या स्थानबद्ध पोलिसांच्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर शिवसेनेसोबतचा भाजपाचा संघर्ष आणखी पेटणार असल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भावी सहकारी सूचक शब्दानंतरही ही कारवाई झालेली असल्याने भाजपा आणि शिवसेना तुर्तास एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *