Breaking News

भाऊंच्या मदतीला दादा आल्याने दादांची गोची खडसे सरकारला घेरतात तेव्हा

नागपूर : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमधील एकनाथ खडसे आणि विरोधकांकडून एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रसंग वाढत आहेत. आज सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुन्हा त्याचा प्रत्यय आला. नाथाभाऊंच्या मदतीला दादा धावल्यामुळे मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत दादा यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

विधानसभेत जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अंमळनेरमधील ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी असलेल्या दुष्काळसदृष्य गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान केली.

त्यास उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताई नगरमधील फक्त १५४ गावांची आणेवारी ५० पैशा कमी आहे. त्यामुळे त्या गावांसाठी दुष्काळ जाहीर करता येणार नाही. राज्यातील अन्य गावांची माहिती घेवून एकत्रित दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत देण्यात येईल.

त्यावर खडसे यांनी उपप्रश्न उपस्थित करत माझ्याकडे या तिन्ही तालुक्यातील गावांची आकडेवारी आली असून ती जळगांवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली असल्याचे स्पष्ट केले.

त्यावर बोदवड आणि अंमळनेरमधील गावांची माहिती घेवून त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

नेमक्या याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी हरकत घेत प्रश्नाच्या छापील उत्तरात या तिन्ही तालुक्यातील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पुन्हा नव्याने माहीती घेतो म्हणून सांगण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला.

त्यावर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मंत्र्यांना आणखी गावांची माहिती घ्यायची असल्याने ते बोलले असतील असे मत व्यक्त केले. त्यावर अजित पवार यांनी अध्यक्षांना हात जोडून धन्य आहे धन्य आहे असे उपरोधिक म्हणत खाली बसले.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *