Breaking News

शिवसेनेचे डॅमेज रोखण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारच कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबध नाहीच

नवी दिल्ली : प्रतिनिधी

मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणाऱ्या कंगना राणावत हिच्या ट्विटरवरील वक्तव्यांना जाब विचारण्याच्या नादात सुरू झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे डॅमेज व्हायला लागले. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आघाड़ीचे कर्तेकरविते शरद पवार यांनी पुढाकार घेत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईशी राज्य सरकारचा संबध नसल्याचे सांगत या प्रकरणापासून सरकार लांब असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कंगना प्रकरणाशी सरकारचा काही संबंध नसून कार्यालयावर मुंबई पालिकेने कारवाई केली. परंतु, शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास नकार देत कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगत अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही. तसेच या प्रकरणावरून विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन त्यांनी केले.

मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावा असं वाटत असेल अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावतने मुंबईची तुलना पाक-व्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी तीला प्रतित्तुर दिले. त्याचाच धागा पकडत तीने आणखी मुंबई आणि महाराष्ट्राविषयी टिका करणारे ट्विट केले. त्यामुळे त्यात आणखीनच भर पडत या प्रकरणाला राजकिय वळण मिळाले. त्यातच भाजपाने कंगनाला पाठिंबा देत तीचे उघड समर्थन करण्यास सुरुवात केले. यात भरीस भर म्हणजे केंद्राने तीला वायप्लस या दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली आणि या गोष्टीचे आणखी राजकियीकरण झाले.

वास्तविक पाहता कंगनाने मुंबईविषयी केलेल्या ट्विटवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मत व्यक्त करत संजय राऊत यांना तीला प्रतित्तुराची नव्हे तर तीला मानसिक उपचाराची गरज असल्याचे मत व्यक्त करत तीच्या वक्तव्यांना प्रतित्तुर देवू नका असा सल्लाही शिवसेनेला दिला होता. मात्र शिवसेनेने तीला प्रतित्तुर देण्याच्या नादात स्वत:चेच डॅमेज करून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा अखेर शरद पवार यांना याप्रश्नी पुढाकार घ्यावा लागला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *