Breaking News

मंत्री जयंत पाटील यांचा असाही लाँग ड्राईव्ह आणि चर्चा मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास

यवतमाळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा… सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा दिनक्रम असताना सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं… त्यांना मार्गदर्शन करता यावं…म्हणून चक्क प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री स्वतः गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत

हे सगळे दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नसल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३.१७ असा जवळपास अडीच तासाची स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या  वागणूकीने युवा टीम प्रभावित झाली.

Check Also

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पदोन्नतीतील १००% रिक्त जागा भरणार आरक्षित जागांसह तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *