Breaking News

मान्य केलेल्या पुरवण्या मागण्या रद्द करुन नंतर चर्चा घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी मान्य केलेल्या पुरवणी मागण्या रद्द करून त्यावर उद्या मंगळवारी चर्चा घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांसह केली.

याच कृतीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील म्हणाले की, सरकारने पुरवण्या मागण्या रेटून नेवून गोंधळामध्ये मांडल्या आहेत. हेच मुळात लोकशाहीच्या चर्चेचे औचित्य सोडून केलेली कृती आहे याचा निषेध म्हणून आणि मराठा व धनगर आरक्षणाचा अहवाल मांडला जात नसल्याने सर्व सभासदांनी बैठक मारल्याची आठवण सभागृहात सत्ताधाऱ्यांना करुन दिली.

मराठा आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल आणि पुरवण्या मागण्या यावरुन आज विधानसभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच सरकारने पुरवण्या मागण्या मजुंर करुन घेतल्या. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये ठरलेले असतानाही सरकारकडून पुरवण्या मागण्या गोंधळात मंजुर करुन घेतल्याने आमदार जयंत पाटील यांनी दालनात ठरल्याप्रमाणे सरकार वागत नसल्याचा आरोप केला आणि पुरवण्या मागण्यावर उदया चर्चा घ्यावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चाही ठरली परंतु त्याअगोदर दालनात ठरलेल्या विषयानुसार चर्चा झाली तरच बैठक होईल असे आमदार जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सुरुवातीला १५ मिनिटासाठी सभागृह तहकुब करण्यात आले.

सभागृहात मांडण्यात आलेल्या २० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या रद्द करा आणि उदया चर्चा घ्या शिवाय दुष्काळावर आम्हाला चर्चा करायची आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी अजून एक आठवडा वाढवावा अशी मागणीही आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

दरम्यान सरकार योग्य ती चर्चा करत नसल्याने विधीमंडळ पक्षनेते अजितदादांसह सर्वच विरोधी सदस्य सभागृहात बैठक मारुन बसले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चेसाठी विरोधी सदस्यांना विशेषत:अजितदादा यांना चर्चेला पाचारण केले मात्र मराठा आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका अजितदादा पवार आणि विरोधी सदस्यांनी घेतली. मात्र त्यानंतरही सरकार व्यवस्थित चर्चा करायला तयार नसल्याने विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे मराठा अहवाल आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी केली. शिवाय पुरवण्या मागण्यांची चर्चा उदया घ्यावी अशी जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकुब करण्यात आले.

Check Also

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *