Breaking News

राम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा

मुंबई: प्रतिनिधी

अयोध्येतील राम मंदीर जमिन खरेदीप्रकरणाची चौकशी मागणी केल्याच्या निषेधार्थ भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आज फटकार मोर्चा काढला. मात्र शिवसैनिकांनीच भाजपा कार्यकर्त्यांना फटके लगावल्याचे दृष्य आज शिवसेना भवन परिसरात पहायला मिळाले. दरम्यान शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने सामने आल्याने राडा होण्यास सुरुवात झाल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगवत काही दोन्ही पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अवघ्या आठ मिनिटात राम मंदीरासाठी लागणारी २ कोटी किंमतीची जमिन १८ कोटी रूपयांना खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी याप्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात यावर अग्रलेखही छापून आला. त्यामुळे शिवसेनेच्या या मागणीच्या विरोधात भाजपाने फटकार मोर्चाचे आयोजन केले. सदर मोर्चाला पोलिसांनी शिवसेना भवनाच्या अलीकडील राजा राणी चौकातच अडविला. मात्र काही कार्यकर्त्ये शिवसेना भवनाच्या दिशेने चालत गेले. त्यावेळी शिवसेना भवनाच्या परिसरात असलेल्या शिवसैनिकांनी काही कार्यकर्त्यांना याबाबत विचारणा सुरुवात केल्याने बाचाबाचीचा प्रकार सुरु झाला. अखेर भाजपाचे कार्यकर्त्येही मोठ्या प्रमाणावर शिवसेना भवनाच्यादृष्टीने येण्यास सुरुवात झाल्याने पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत पांगविले.

याप्रकारानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माहिम पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन करत शिवसेना नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी  भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसैनिकांनी पाठीमागून हल्ला केला

आंदोलन संपल्यानंतर आम्ही चौघे पार्किंगला लावलेली गाडी काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काही शिवसैनिकांनी आमच्यावर मागून येऊन हल्ला केला. आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी श्रद्धा जाधव तिथे पोहोचल्या. त्यांनी शिवसैनिकापेक्षा आधी महिला म्हणून माझा विचार केला पाहिजे होतो. त्यांनी आम्हाला होणारी मारहाण रोखली पाहिजे होती, अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

शिवसेना नव्हे, ही तर खिल्जी सेना

शिवसैनिकांनी भाजप युवा मोर्चाचे विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांच्यावर हल्ला केला. भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांनी आपल्यावर-एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे, यांचं कसलं हिंदुत्व असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर यांनी केला.

गुंडा सेना, हप्तावसुलीवाले आले आहेत हे, आमचे युवा मोर्चेवाले आले, गाडीने जात होतो आम्ही, हे सेनावाले आले आणि आम्हाला मारायला लागले, यांच्या बापाचं आहे का दादर? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

गुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *