Breaking News

मोदी मत्सर हीच राज्याची प्राथमिकता आहे काय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात जनहितार्थ आम्ही सरकार सोबत आहोत पण दुर्दैवाने राज्य सरकार जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये दोनच बाबीं वारंवार दिसतात. एक म्हणजे मोदी मत्सरात हीच प्राथमिकता मानून निर्णय होतात की काय? आणि केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठीच निर्णय होतात की काय? असे प्रश्न आम्हाला पडतात, अशा शब्दांत राज्यातील आघाडी सरकारवर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी समाचार घेतला.

राज्यातील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसिकरण अद्याप पुर्ण झालेले नाही असे आज समोर आले आहे. तसेच ४०% फ्रंटलाईन वर्कर्संना दुसरा डोस उपलब्ध होत नाही. तिसरीकडे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना वणवण करावी लागते आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसच देऊ शकत नाही असे सरकार सांगते आहे. राज्य सरकारचे योग्य नियोजन नसल्याने अशी वणवण नागरिकांना सहन करावी लागते आहे. आमची आघाडी सरकारला विनंती आहे हवे तर आमच्या निवेदनांना उत्तर देऊ नका, आमच्या पत्रांना हव तर केराची टोपली दाखवा, पण किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या. आपले राजकीय हीत बाजुला ठेवून जनहिताला प्राधान्य द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

आघाडी सरकार निर्णय घेताना वारंवार राजकीय हित डोळ्या समोर ठेवते. केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात राज्यातील जनतेचे हाल केले जात आहेत. जेव्हा लस आली तेव्हा राज्यातील एका कँबिनेट मंत्र्यांनी ही मोदी लस असल्याचे विधान करुन गैरसमज पसरवले. नंतर केंद्र सरकारने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस द्या सांगितले ते काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही. तर केंद्राने जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याच्या सुचना केल्या तेव्हा राज्य सरकारने ४५ वयोगटाची मागणी केली. अशा प्रकारे प्रत्येक वेळी राजकीय हीत साधले जात आहे हे दुर्दैवी आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

One comment

  1. दलितांचे खच्चीकरण, भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत समावून घेणे म्हणजे एकूण भारतीय जनतेच्यावर हुकूमत गाजवण्या साठी तुम्ही वाट्टेल त्या गोष्ठी करणे तुम्हाला का करावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *