Breaking News

रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट असल्यानेच अपक्ष आमदारांवर दबाव आणला आमदार राजेंद्र याड्रावकर यांना धमकवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी कमी पडणाऱ्या आमदारांच्या व्यवस्थेसाठी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी थेट अपक्ष आमदारांना फोन करून भाजपाला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणत होत्या. त्यासाठी शिरोळचे अपक्ष आमदार तथा महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर-पाटील यांना धमकाविल्याचा गौप्यस्फोट करत रश्मी शुक्ला या तर भाजपच्या एजंट होत्या असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शिरोळचे अपक्ष आमदार व महाविकास आघाडी सरकार मधील राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना रश्मी शुक्ला यांनी जर तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा द्याल तर याद राखा. ” मेरे साथ चाय पिओंगे तो क्या नमक हरामी होगी ? अशा शब्दात शुक्ला यांनी याड्रावकर यांना दम भरल्याची माहिती दिली. शुक्ला यांनी अशा प्रकारे अपक्ष आमदारांवर दबाव आणि धमकावित राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवू नये यासाठी प्रयत्न केले. तसेच याच काळात शुक्ला यांनी संजय पाटील या डीवायएसपी यांना यड्रावकर यांच्यावर पाळत ठेवायला सांगितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
यामुळे सध्या विरोधी पक्षनेते जो आरोप करत आहेत त्यामागे सरकार विरोधी सुनियोजित कटाचा भाग असल्याचे आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून रश्मी शुक्ला यांनी अनेक मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप करण्याचे गैरकृत्य केले. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन मुख्य सचिव व गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची माफी मागितली. त्यांच्यावर कठोर कारवाईचा निर्णय देखील घेतला असता. पण त्यांनी स्वतःच्या पतीचे निधन नुकतेच झाले आहे. माझी चुक झाली, माफ करा अशी विनवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने उदार व मानवतावादी मनाने त्यांच्यावर कारवाई न करता बदली केली. पण भाजप विचाराने प्रभावित असलेल्या शुक्ला यांनी टॅपिंग केलेले टेप विरोधी पक्षनेत्याला सोपवून आपण भाजपाच्या एजंट असल्याचे दाखवून दिल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त यांचे थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी थेट संबध येत असतात. त्यामुळे आपल्याला चांगली पोस्टींग मिळावी यासाठी नवाज-इंगाले सारख्या चिल्लर माणसांशी अशा व्यक्ती बोलतील का? असा सवाल उपस्थित करत आपणच माणसे प्लॅंन्ट करायची आणि आपणच टॅप करायचे आणि भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करायचा. हे सगळं महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी करण्यात येत असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *