Breaking News

शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणाः १० चा निकाल उद्या जाहीर होणार १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी १ वाजता जाहिर होणार

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी ची परिक्षा रद्द करत या सर्व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून त्यानुसार मार्क देत त्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १० वी विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या १६ जुलै रोजी निकाल जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर १० वीच्या परिक्षा घ्यायच्या नाही या विचारात राज्य सरकार होते. तसेस केंद्र सरकारकडून केंद्रीय बोर्डाच्यां परिक्षा पुढे ढकलायच्या कि रद्द करायच्या या द्विधा मनस्थितीत होते. अखेर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सीबीएई बोर्डाने १० वीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर १० वीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत मुल्यांकनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला.
१० वी परिक्षेसाठी जवळपास ९ लाखाहून अधिक मुले तर ८ लाखाहून अधिक मुलींनी असे मिळून १६ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरला होता. या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल उद्या १६ जुलै २०२१ रोजी दुपारी जाहिर करण्यात येणार असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी १० वी परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मुल्यांकनासाठी २८ मे २०२१ रोजी शासन निर्णय जारी करत त्यासंबधीचे धोरण जाहीर केले होते. त्यानंतर केवळ २० दिवसात विद्यार्थ्यांची मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण करत १० वी चा निकाल जाहिर करण्यात येत आहे.
इयत्ता दहावीची एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या सन २०२१ च्या इयत्ता दहावीत एकूण मुले- ९ लाख ९ हजार ९३१ प्रविष्ट होते, तर मुली -७ लाख ७८ हजार ६९३ असे एकूण- १६ लाख ५८ हजार ६२४विद्यार्थी  प्रविष्ट होते.  एकूण  आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. राज्य मंडळ स्तरावर ३ जुलै २०२१ ते १५ जुलै, २०२१ अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.
संकेतस्थळावर निकाल
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी ) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण  http: //result.mh-ssc.ac.in  या सकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.१० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.
२८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *