Breaking News

इंडियन ऑईलचा इंडेन गॅस बुक करायचाय? मग हा नवा नंबर डायल करा ग्राहकांसाठी देशभरात आता एकच बुकिंग नंबर

मुंबई : प्रतिनिधी

सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग साठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक ७७१८९५५५५५  या नंबर वर गॅस सिलिंडर बूक करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल.

या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर बूक करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठीच सोय झाली असून इंडेन LPG रिफील सिलिंडर बुक करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कल मध्ये असले तरी त्यांचा इंडेन रिफील बुकिंग नंबर हा तोच राहणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कल साठी वेगळ्या इंडेन रिफील बुकिंग नंबरची योजना ३१.१०.२०२० च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी LPG रिफील बुकिंगसाठी एकाच कॉमन नंबर ७७१८९५५५५५ हा असेल.

ग्राहक केवळ त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरून इंडेन LPG रिफील बुक करू शकतात. LPG रिफील बुक करण्याची सुधारित पद्धती आणि मोबाईल नोंदणी खालील प्रमाणे आहे.

(अ) जर ग्राहकांचा मोबाईल नंबर इंडेन रेकॉर्ड मध्ये आधीच नोंदणी केलेला असेल तर IVRS द्वारा एक १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक मिळेल. हा १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन LPG बिल/ इन्वोइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन वौचर वर नोंदला असेल याची दखल घ्यावी. ग्राहकांनी हे निश्चित केल्यावरच रिफील बुकिंग स्वीकारले जाईल.

(ब) जर ग्राहकांचा मोबाईल नंबर इंडेन रेकॉर्ड मध्ये नसेल तर त्यांनी त्यांचा ७ आकड्याने सुरु होणारा १६-अंकी ग्राहक ओळख क्रमांक टाकून वन टाईम रजिस्ट्रेशन द्वारे मोबाईल नोंदणी करून घ्यावा. ह्याच्या सोबतच त्याच IVRS कॉलवर त्याचे अधिप्रमाणन करून घ्यावे. हे केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल नंबर नोंदणी केल्या जाईल आणि LPG रिफील बुकिंग स्वीकार होईल. हा १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन LPG बिल/ इन्वोइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन वौचर वर नोंदला असेल याची दखल घ्यावी.

इंडेन LPG च्या अधिक माहिती साठी आमच्या https://cx.indianoil.in या संकेत स्थळाला भेट द्या किंवा IndianOil ONE mobile app डाउनलोड करून घ्या., असे आवाहन IndianOil- पश्चिम क्षेत्रच्यासर-व्यवस्थापक (कॉर्पोरेट काम्युनिकेशन्स) अंजली भावे यांनी केले आहे.

 

Check Also

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: परिक्षा नाही- मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता लहान मुलांनाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *