Breaking News

पॅन आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे नवीन तारीख मात्र या गोष्टींची घ्या काळजी

मुंबई : प्रतिनिधी

पॅन कार्डशी आधार कार्ड जोडण्याची मुदत आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर विभागाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

यापूर्वी पॅन आधारशी जोडण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख दिली होती. मात्र, आता ही मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार-पॅन लिंक करण्याच्या मुदतीत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे.  याआधी जुलै महिन्यात शेवटची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.

३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डासोबत लिंक केलेलं नसेल तर ते इनअ‍ॅक्टिव्ह होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर कायदा कलम २७२B अंतर्गत १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. पॅनकार्ड इनअ‍ॅक्टिव्ह असेल तर बँकिंग व्यवहारापासून, प्रॉपर्टी विकत घेणे, विकणे अशा आर्थिक व्यवहारामध्ये, स्टॉक आणि म्युचअल फंडच्या गुंतवणूकीमध्येही अडथळे येऊ शकतात.  कार्यान्वित नसलेले पॅनकार्ड देखील तुमच्याकडे पॅनकार्ड नसल्यासारखेच आहेत. तुम्ही आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक केल्यानंतर ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होऊ शकते.

असं करा आधार-पॅन लिंक

– आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

– तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.

– ‘View Link Aadhaar Status’  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल. याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.

– UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

 आधार-पॅन जोडताना ही काळजी घ्या

आधार किंवा पॅन ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे लिंक करू शकता. आपला आधार पॅनशी जोडताना काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आधार-पॅन लिंक करण्यासाठी आपल्या पॅन आणि आधारच्या नावामध्ये कुठलीही चुक किंवा जन्म तारीख चुकीची तर नाही हे तपासून घ्या. जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपणास पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया रद्द करावी लागेल.

Check Also

टीसीएसने जाहिर केला बंपर डिव्हीडंट जाहिर १०४ टक्के डिव्हिडंट

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात टीसीएस (TCS) ने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या शेअरहोल्डर पेआउट, ज्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *