Breaking News

करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी

देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत आयकर विभागाने पुन्हा १० दिवसांची  मुदत वाढ दिली असून आज ज्यांना कर भरणा आणि कर परताव्याचा अर्ज भरता आला नाही त्यांच्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर कंपन्यांमधील पार्टनर आणि कंपनी खात्याच्या ऑडिट करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यतची मुदवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात संध्याकाळी उशीरा आयकर विभागाकडून यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक जारी करत याबद्दलची माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करावा लागल्याने सर्वच आर्थिक आणि वित्तीय केंद्रे बंद करावी लागली होती. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरु आहेत. तरीही सर्वच गोष्टी पुरेशा स्वरूपात सुरु झालेल्या नसल्याने कर भरणा करणे आयकर दात्यांना आणि कंपन्यांना अशक्य बनत आहे. यापार्श्वभूमीवर आयकरदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी १० दिवसांनी मुदत वाढविण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला.

यापूर्वी ३१ डिसेंबर २०२० पर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यात आता १० दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता कर दात्यांना दिलासा मिळाला आहे. तर कंपन्यांसाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यत देण्यात आली होती. त्यातही आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून पार्टनर आणि कंपन्यांना १५ फेब्रुवारी पर्यंत आपल्या खात्याचे ऑडिट करून त्यानुसार आपला अहवाल आयकर खात्याकडे सादर करावा लागणार आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *