Breaking News

नवरात्रीच्या मुहुर्तावर अंमलात आणा आर्थिक नियोजनाच्या ९ बाबी आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल उचला

मुंबईः प्रतिनिधी
नवरात्र आजपासून (७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो. या पूजेबरोबरच जर आपण आपल्या आर्थिक नियोजनाच्या दिशेनं पावले टाकली तर भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक नियोजन म्हणजे आपलं उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचं एक चक्रच असतं. भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये आर्थिक नियोजनाच्या दिशेने उचलल्या जाणाऱ्या ९ बाबींची आपण माहिती घेऊया. याबाबतचं वृत्त एका वृत्तवाहिनेन दिलं आहे.

1) आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आर्थिक ध्येय निश्चित करण्यापासून सुरू होते. भविष्यात तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची आहे हे आधी ठरवा. भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे.

2) कोणत्याही गुंतवणूकीचा पर्याय निवडण्यापूर्वी, तुम्ही तुमची जोखीम किती आहे हे समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण गुंतवणुकीसाठी ज्या उत्पादनाची निवड करणार आहात त्याच्याशी संबंधित जोखीम सहन करण्यास आपण किती सक्षम आहात. त्यानंतर तुमच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार उत्पादन निवडा.

3) आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्ही पैशाशी संबंधित वाईट सवयी सोडा. म्हणजेच अवाजवी खर्च करू नका. तुम्ही बचत करा आणि मग गुंतवणूक करा. आवश्यक तिथे खर्च करा.

4) गुंतवणुकीसाठी तुम्ही जो पर्याय निवडत आहात त्यात विविधता ठेवा. यामुळे गुंतवणुकीचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ वाढण्यास मदत होईल.

5) आर्थिक नियोजन केवळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम उत्पादनं निवडण्यापुरतं मर्यादित नाही. तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचं पुनरावलोकन करत रहा. त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीचा मार्ग बदला.

6) आर्थिक नियोजन करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. आपल्या यशस्वी आर्थिक जीवनात मार्गदर्शक उपयुक्त ठरू शकतो.

7) अनेकदा आपण निवृत्ती नियोजनाबाबत गंभीर नसतो. पण आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज करणे. चांगल्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी एक चांगला निधी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

8) आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे काही मूलभूत ज्ञान असलं पाहिजे. त्यामुळे तुमचं आर्थिक ज्ञान वाढवून तुमच्या पैशाचं व्यवस्थापन चांगलं होईल.

9) आर्थिक नियोजनात कोणत्याही एका दृष्टिकोनाला चिकटून राहू नये. सर्वसमावेशक दृष्टिकोन स्विकारणं आवश्यक आहे. तुमचं आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य वाटेल अशा मालमत्ता वर्गांचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करणं आवश्यक आहे.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *