Breaking News

नितीन गडकरी म्हणाले, “दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे….” पुण्यातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गडकरींचे विधान

पुणे: प्रतिनिधी

पुण्यातील रिंगरोडचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आम्ही जमिन अधिग्रहणाच्या अनुषंगाने या संबधीची विचारणा आम्ही शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनीही जमिनी द्यायची तयारी दर्शविली. मात्र त्याची किंमत जास्त सांगितली. त्यामुळे फक्त जमिन अधिग्रहणाच्या कामाची किंमत १८ हजार कोटी रूपयांवर जात असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी हे काम करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या रस्ते प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहण करून द्या…आणि दादा तुमच्यात ती ताकद आहे ते काम तुम्ही करू शकता असे केंद्रीय रस्ते-महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुकोद्गार काढले.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे गडकरींनी नेमके कोणत्या दादांना तुमची ताकद आहे असे म्हणाले यावरून कार्यक्रमस्थळी चर्चेला सुरुवात झाली.

तसेच पुण्यातील रिंगरोडच्या कामासाठी एकतर तुम्ही जमिन अधिग्रहीत करून द्या अन्यथा आम्ही १५ हजार कोटी रूपये देतो तुम्ही रस्त्याचे काम करा अशी पर्यायी सूचना गडकरी यांनी करत तुम्ही जमिन अधिग्रहणाचे काम करू शकाल तुमच्यात ती ताकद आहे असे सांगत दादा या व्यक्तीमत्वाविषयी पूर्ण विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सार्वजनिक जीवनात दादा म्हटले जाते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही राज्याच्या राजकारणातील दादा माणूस म्हणून ओळखले जाते. सद्यपरिस्थितीत अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत तर चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातील कोथरूडचे आमदार आहेत. त्यामुळे काही काळ नेमके कोणत्या दादांच्या ताकदीविषयी गडकरींचे वक्तव्य होते समजू शकले नाही. मात्र कालातंराने गडकरी यांनी ते वाक्य अजित पवार यांच्याशी संबधित असल्याचे भाषण करताना स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांच्या आणि नैसर्गिक संकटातील आर्थिक मदतीसाठी नेमके कोणाला भेटावे असा प्रश्न पडत असल्याचे सांगत केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *