Breaking News

प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी राज्यस्तरीय वाणिज्य उत्सवाची सांगता- निर्यात आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग संचालनालय आणि केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या ‘वाणिज्य उत्सवाची सांगता झाली. यापुढे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हा निहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

“आजादी का अमृत महोत्सव”- ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत २० ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत मुंबई येथे जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रातील सुमारे २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. यात, उद्योजक, निर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारी, निर्यातदार, शासन विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC)  आणि जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर)यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

दोन दिवसांच्या या परिषदेत  एकूण 10 पॅनल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. शासनाच्या  पाठिंब्याच्या माध्यमातून  द्विपक्षीय व्यापार संधी, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, डेव्हलपमेंट क्रेडिट गॅरंटी  इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य याशिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे झाली. यात रशिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका, स्पेन आणि मॉरिशसचे राजनैतिक प्रतिनिधित्व होते.

निर्यात प्रोत्साहनासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे सहकार्य, निर्यात वाढीसाठी द्विपक्षीय व्यापाराच्या संधी, महाराष्ट्र एक निर्यात हब. निर्यात पायाभूत सुविधांच्या निर्मीतीसाठी राज्य शासनाचे सहकार्य, निर्यातीसाठी बंदरे आणि लॉजिस्टीक्स यांचे महत्व, निर्यात प्रोत्साहनासाठी बॅंकींग आणि फायनान्स, खाद्य क्षेत्रातील निर्यात संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात संधी या विषयांवर मान्यवर सदस्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. यासोबतच या क्षेत्रातील उद्योजकांनी आपले अनुभव या ठिकाणी सांगितले.

यात सहभागी मान्यवर हे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधित्व करणारे होते. यात उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विदेश व्यापार महानिदेशालयाचे (DGFT) अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डी, (mmmocl) महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड चे संचालक निखील मेश्राम, उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ.  हर्षदीप कांबळे, दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताकचे उच्चायुक्त  डिन होफ,स्पेन चे उच्चायुक्त श्रीमती वॅनेसा अल्वरेज़ फ्रॅन्को, मॉरिशसचे उच्चायुक्त सीवराह नंदलाल, प्रजासत्ताक टर्कीचे उच्चायुक्त हुसेन आयडिन, रशियाचे निर्यात केंद्र प्रमुख तिमुर वेकिलोव यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी यात सहभाग नोंदविला.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *