Breaking News

सावधान ! तुमचा फोन खूप लवकर डिस्चार्ज होतोय का? असू शकतो व्हायरस हँकिंग टाळण्यासाठी हे काम त्वरित करा

मुंबई: प्रतिनिधी

आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाऊंट देखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही.

व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष म्हणजे आपली महत्त्वाची माहिती हॅक (hack) झाली आहे याबद्दल आपल्याला माहितीही नसते. अशा परिस्थितीत आपला स्मार्टफोन आणि स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स (tips) आणि युक्त्या सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला मालवेअर (malware) पासून आणि स्वतःला सायबर क्राईमचे बळी होण्यापासून वाचवू शकाल.

मालवेअर म्हणजे काय?

सर्वप्रथम आपल्याला हे माहित असलं पाहिजे की आपल्या स्मार्टफोनचा हा शत्रू कोण आहे. मालवेअरबद्दल आपण वारंवार बोलतो. पण मालवेअर म्हणजे नक्की काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. मालवेअर हे एक घुसखोरी करणारं सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या मोबाइल किंवा कॉम्पुटरसाठी घातक ठरू शकतं. हॅकर्स अशा प्रकारचे सॉफ्टवेअर तुमचा वैयक्तिक डेटा चोरी करण्यासाठी वापरतात. व्हायरस, ट्रोजन व्हायरस, वर्म्स, स्पायवेअर आणि रॅन्समवेअर अशी मालवेअरची काही उदाहरणं आहेत.

मोबाइलमध्ये व्हायरस आहे की नाही हे कसं ओळखावं

तुमचा फोन सुरक्षित आहे की नाही किंवा त्यामध्ये व्हायरस (virus) आला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या सोप्या मार्गांनी तुम्ही शोधू शकता.फोन गरम होत असेल

जर तुम्ही तुमचा मोबाइल वापरत नसाल आणि तरीही तो गरम होत असेल तर  तुमचा फोन हॅक झाला असू शकतो. मोबाइल तुमच्या वापराने नव्हे तर हॅकर्सच्या वापराने गरम होऊ शकतो.

इंटरनेट लवकर संपणं

जर तुमच्या मोबाइलमधील इंटरनेट लवकर संपत असेल, तसंच बिल जास्त येत असेल किंवा बॅटरी खूप लवकर संपत असेल तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे.

जाहिरातीचं वाढतं प्रमाण

तुम्हाला तुमच्या मोबाइलवर अनेक अनावश्यक जाहिराती पाहायला मिळत असतील तर सावधगिरी बाळगा. या जाहिरातींद्वारे मालवेअर तुमच्या मोबाइलमध्ये येऊ शकतात.

मित्रांना स्पॅम संदेश

तुमचे मित्र किंवा नातेवाईक यांना तुमच्या फोनवरून स्पॅम मेसेज (Spam messages) येत असतील, तर याचा अर्थ तुमच्या फोनमध्ये मालवेअर आहे. तसंच हे मालवेअर या मेसेजद्वारे तुमच्या मित्र आणि नातेवाईकांच्या फोनमध्ये सहज प्रवेश करू शकतात.

धोकादायक अॅप्स डिलीट करा

तुमच्या फोनमध्ये असे अनेक अॅप्स (apps) देखील असू शकतात जे तुम्ही डाउनलोड केलेले नाहीत. असे अॅप्स त्वरित डिलीट करा. कारण या अॅप्समध्ये मालवेअर असण्याची शक्यता आहे. प्रत्येक वेळी थोड्या वेळाने आपल्या फोनवरील सर्व अॅप्सवर एक नजर टाका.  जर तुम्हाला कोणते अॅप अधिक इंटरनेट वापरत असल्याचं दिसून आलं तर ते अॅप डिलीट करा. तसंच जे अॅप्स तुम्ही जास्त वापरत नाही आणि त्यांना प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर चांगले रिव्ह्यू मिळाले नाहीत ते तुम्ही काढून टाकू शकता.

व्हायरस कसा टाळावा

तुम्हाला जे अॅप डाउनलोड करायचे आहे ते फक्त Google Play Store किंवा App Store वरून अधिकृतपणे डाउनलोड करा. तिथंही डाउनलोड करण्यापूर्वी अॅप नीट तपासा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते काही परवानग्या मागते. तुम्ही कोणत्या परवानग्या देत आहात हे लक्षात ठेवा. आपल्या फोनच्या संरक्षणासाठी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *