Breaking News

अन्य उपाय न मिळाल्यास संपूर्ण लॉकडाऊन दोन दिवसात यासंदर्भातील नियमावली जाहिर करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यातील वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ढिलाई आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मी अनेकांशी चर्चा करत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. मात्र नवा पर्याय मिळाला तर कडक निर्बंध लागू करणार परंतु जर नवा पर्याय मिळाला नाही तर संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला देत यासंदर्भात पुढील एक-दोन दिवसात कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भातील नियमावली जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना परिस्थितीने आता आक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे. त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही काहीजण राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असून लॉकडाऊन कराल तर आम्ही रस्त्यावर उतरू, कष्टकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करा असे काहीजण सल्ला देत आहेत. परंतु मी तर त्यांना म्हणतो की, कि तुम्ही जरूर रस्त्यावर उतरा मात्र ज्या कुटुंबातील प्रमुख गेले त्यांच्या मदतीसाठी, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना रोखण्याच्या कामात मदत करण्यासाठी असे आवाहन करत कृपया याच्यात राजकारण आणू नका अशी सूचना करत कृपया राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळ नका असे आवाहनही त्यांनी केले.

सल्ले देणाऱ्या उद्योजकाला सांगतोय की, सुविधा वाढवतोय पण रेमिडेसीवर देणाऱ्यांसाठी, व्हेटिलेंटर लावण्यासाठी, आयसीयु बेडसाठी तज्ञांची गरज लागते. डॉक्टर-नर्स आणायचे कोठून असा सवाल त्यांनी यावेळी केला.

कोरोनाने आपल्यावर अजून मात केलेली नाही. ती मी करू देणार नाही. परंतु सर्व राजकिय पक्षांना सांगतोय कि जनतेच्या जीवाशी खेळू नका, त्यांचे रोजगार वाचवायाचेय, त्यांचे नोकऱ्या वाचवायचे आहेत. पण सगळ्यात आधी त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. त्यासाठी कडक लॉकडाऊन लावावा लागेल. जरी मी लॉकडाऊन म्हणत असलो तरी तो एकमेव पर्याय, उपाय नाही. पण कडक निर्बंध लागू करावे लागतील. त्यासंदर्भातील नियमावली एक दोन दिवसात जाहिर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी एक दोन दिवसात मी आणखी काही राजकिय पक्ष, पत्रकारांशी बोलणार आहे. त्याच्याकडून मला नवा उपाय हवा आहे. तो नवा उपाय नाही मिळाल्यास लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही असा गर्भीत इशारा देत लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत त्यांनी दिले.

दररोज अडीच लाख चाचण्या करणार

राज्यात सध्या १ लाख ८२ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. आता या चाचण्या दिवासाकाठी अडीच लाख इतक्या करण्यात येणार आहेत. या सर्व चाचण्या आरपीसीआरनुसार करण्यात येणार आहे. सध्याच्या चाचण्यांपैकी ७० टक्के चाचण्या आरपीसीआरनुसार करण्यात येत आहेत. तर इतर चाचण्या अँण्टीजन टेस्ट पध्दतीने करण्यात येत आहेत.

पावणेचार लाख बेड्स उपलब्ध

सध्या राज्यात पावणे चार लाख बेड्स राज्यात उपलब् आहेत. यापैकी १ लाख ४२ हजार बेड्स भरले आहेत. १.४२ हजार बेड भरले असून आयसीयुतील एकूण बेड्सपैकी ४२ टक्के भरले आहेत. तर ९ हजार ४५ व्हेटीलेटर पैकी २५ टक्के व्हेटीलेटर वापरात आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील १५-२० दिवसात सर्व रूग्णालये तुडुंब भरतील अशई भीती व्यक्त करत त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लसीकरणात महाराष्ट्र देशात प्रथम

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण आपण मोठ्याप्रमाणावर करत आहोत. काल दिवसभरात ३ लाख इतके लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत ६५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे लसीकरणात प्रथम राज्य बनले आहे. राज्यात लसीकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याची मागणीही आपण केंद्राकडे करतोय, पण त्याचा पुरवठा आपल्याला होत नाही. ही प्रमुख अडचण आहे. पुरवठा सुरळीत झाल्यास लसीकरण मोहिमेत आणखी वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन हा उपाय नाही पण जनतेचे प्राण वाचविणे महत्वाचे

मागील काही दिवसात आपल्यात ढिलाई आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे सांगत आताही या विषाणूला रोखण्यासाठी ठोस असे काही नाही. त्यामुळे मास्क वापरा, हात सतत धुवा, सोशल डिस्टंसिंग पाळणे हेच आपल्या हाती आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन अद्यापही लागू आहे. तेथे तर मृत्यूबरोबर बेरोजगारीचे संकट वाढताना दिसत आहे. आपल्याकडची परिस्थिती पाह्यली तर आता हे कोरोनाचे वादळ आले असून याला थोपवायचे असेल तर लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही. मात्र त्यावर दुसरा उपाय मी शोधत असून राज्यातील जनतेचे प्राण वाचविणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे दुसरा उपाय न मिळाल्यास संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *