Breaking News

म्हाडा उपाध्यक्ष म्हैसकर यांची पुन्हा मंत्रालयात बदली अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी

ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची तेथून बदली करण्यात आली असून त्यांच्या महसूल व विभागापैकी वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या.

नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे विद्यमान सचिव संजय खंदारे यांची महाजनकोच्या व्यवस्थापकिय संचालक आणि चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची राज्याच्या मुख्य सचिव यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली असून जलस्वराज्य प्रकल्पाचे व्यवस्थापक ए.ए.गुल्हाने यांची नवी मुंबईहून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.अतिरिक्त जिल्हाधिकारी के.एच.बगाटे यांची साईबाब संस्थानच्या मुख्या कार्यकारी अधिकारी नियुक्ती करण्यात आली.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *