Breaking News

एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली.

सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर, सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली. याशिवाय डॉ. राजेश देशमुख यांच्या ठिकाणी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती हाफकिन औषध निर्माण महामंडळावर व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून संदीप कदम यांची नियुक्ती भंडारा जिल्हाधिकारी पदी करण्यात आली.

Check Also

दिवाळीला मुंबईत फटाके-आतशबाजीवर बंदी पण या दिवशी या गोष्टी वाजविण्यास परवानगी कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी प्रकाशाचा आणि आनंदाचा सण अशी ओळख असणारी ‘दीपावली आता अवघ्या काही दिवसांवर येऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *