Breaking News

हैदराबादमध्ये भाजपाने केंद्रीय टीम आणूनही तिसऱ्या स्थानी टीआरएस प्रथम तर एमआयएम दुसऱ्या स्थानी

मुंबई : प्रतिनिधी
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या भाजपाच्या पुढे जात टीआरएस ७१ जागांवर पुढे राहिली आहे., एआयएमआयएम ४३ आणि भाजपाची ३४ जागांवर घोडदौड सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वस्व पणाला लावलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. हैदराबाद महापालिकेच्या १५० जागांवर एकूण ११२२ उमेदवार रिंगणात आहेत.
तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि एमआयएमच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारत असल्याचे चित्र सुरुवातीला समोर आले होते, मात्र भाजप पुन्हा एकदा पिछाडीवर गेली आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने टीआरएसच्या जागांवर आघाडी मिळवली होती. टीआरएस ७१ जागांवर पुढे, एआयएमआयएम ४३ आणि भाजपाची ३४ जागांवर घोडदौड सुरू आहे.
दरम्यान, तेलंगणा राज्य सरकारचे मंत्री टी श्रीनिवास यादव यांनी हैदराबाद महापालिका निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांद्वारे होत असलेल्या प्रचारावर हल्लाबोल केला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन करत आहेत, तर केंद्रीय मंत्री स्थानिक निवडणुकांमध्ये लुडबूड करत आहेत.
दरम्यान हैद्राबादच्या भाजपच्या कामगिरीवर प्रतिक्रिया विचारलीअसता भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घाईने प्रतिक्रिया देण्यास नकार देत भारतीय जनता पक्षाची कामगिरी मागील वेळेपेक्षा सुधारली असल्याचे सांगितले जात आहे.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *