Breaking News

हैद्राबादेतील चकमकीचे भाजपा, काँग्रेसकडून स्वागत तर शिवसेना-राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया कायदे तज्ञ, विचारवंतांकडून चिंता

मुंबईः प्रतिनिधी
हैद्राबाद येथील एका तरूण महिला डॉक्टरवर बलात्कार करून तीला जाळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात पडत असून भाजपा आणि काँग्रेसच्या महिला नेत्या आणि आमदाराने स्वागत केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्याने चकमकीवरून राजकिय वातावरण चांगलेच तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली.
महिला डॉक्टरवर बलात्कार करून तीला जीवंत जाळल्यानंतर अटक करण्यात आलेल्या पोलिसांनी आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यावेळी त्या चार आरोपींनी पोलिसांसोबत अरेरावी करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळीबाळ करत त्यांना ठार मारल्याचे हैद्राबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त कळताच भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी बलात्कारी आरोपींना अशीच शिक्षा दिली पाहिजे. मात्र अशा आरोपींच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करून त्यामार्फत निकाल लावला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
तर भाजपाच्या वरिष्ठ महिला नेत्या शायना एन.सी यांनी पोलिसांनी केलेल्या कृत्याचे स्वागत करत बलात्कारी आरोपींवर अशीच कारवाई करत न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
काँग्रेसच्या महिला आमदार प्रणिती शिंदे यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन करत तेथील सरकारने पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला पाहिजे असे सांगत या चकमकीची फाईलच बंद करावी अशी मागणीही केली.
दरम्यान शिवसेनेच्या महिला नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांनी चकमक केलेल्या पोलिसांची चौकशी सीआयडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत अशा मार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनेवर पडदा पडावा यासाठी पोलिस काही लोकांना अटक करतात. जर ते खरेच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती. पण या घटनेची चौकशी व्हायला हवी असे मत व्यक्त करत सावध प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसनेचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे. परंतु ही पद्धत अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनीही सदर घटनेबाबत चिंता व्यक्त केली.

Check Also

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *