Breaking News

भाजपाला जितका वेळ पराभूत करणार तितके पेट्रोल-डिझेलचा भाव कमी होत राहणार ही लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार आणि केंद्राची ही सततची लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला यामुळे केंद्राकडून मोठ्याप्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली.

दरम्यान जनतेला केंद्र सरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाल्याचेही ते म्हणाले.

काल दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने आणि दोनच दिवसांपूर्वी देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणूकांमध्ये भाजपाला अपयशाला सामोरे जावे लागले केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ५ रूपये आणि १० रूपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला. मात्र पेट्रोल-डिझेलवरी व्हॅट करात घट केल्याचे वित्त विभागाने जाहिर केले. परंतु या दोन्ही वस्तुंवरील नेमका किती कर कमी केला याची माहिती देण्याचे वित्त विभागाने टाळले आहे.

सततच्या करवाढीवरून आधीच भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांनी सातत्याने आंदोलन करत केंद्र सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. तसेच संसदेतही याप्रश्नी विरोधकांकडून आवाज उठविण्यात आला. तरीही केंद्र सरकारकडून याप्रश्नी एकदाही उत्तर देण्याचा प्रयत्न झाला नाही. उलट काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी देशातील सध्या राबविण्यात येत असलेल्या मोफत लसीकरणामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत असल्याचे वक्तव्य करत विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांचे हे वक्तव्य केंद्र सरकारच्याच अंगाशी येण्याची शक्यता झाल्याने त्यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ एकाही भाजपा नेत्याने समर्थनार्थ वक्तव्य केले नाही.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *