Breaking News

महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

बीड : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे “केशरबाई सोनाजी क्षीरसागर” उर्फ “केशरबाई काकू” यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केशबाईकाकूंचे चिरंजीव व माजी मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. आजवर या होमिओपॅथिक कॉलेजमधून अनेक नामवंत होमिओपॅथी डॉक्टरांनी शिक्षण प्राप्त केले व लौकिक मिळवला आहे. कोविड -१९ महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे भारतातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदत देखील घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे, काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. कालिदास थिगळे यांच्यासहित होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *