Breaking News

पुरग्रस्तांसाठी अखेर भाजपा आमदारांचे वेतन महाराष्ट्राच्या खात्यात भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला-अॅड. शेलार

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर या विषाणूचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन करत राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी देण्याचे आवाहन केले. मात्र भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी जमा करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या पंतप्रधान केअर फंडला एक महिन्याचे वेतन दिले. त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी देण्याऐवजी पंतप्रधान केअर फंडात निधी जमा केल्यावरून मोठी टीकेची झोड उठली. मात्र यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुर आणि दरड कोसळून झालेल्या जीवीतहानीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत आमदारांचे वेतन जमा केले आहे.

राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला.

त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले. त्यानंतर आता विधान परिषद आणि विधानसभेतील भाजपा आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

भाजपाच्या या पुढाकाराने महाराष्ट्र विरोधी भाजपा अशी निर्माण झालेली प्रतिमा काही प्रमाणात स्वच्छ होण्यास मदत होईल.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *