Breaking News

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम

जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात नाही. त्यामुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केलेले असले तरी त्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. त्यामुळे जगभरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर डब्लूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी नुकतेच एक विधान करत कोरोनामुक्त होवू शकतो असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे वळले.

आज जगातला एकही देश करोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. तसेच, करोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधे हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल असे आवर्जून सांगत जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचे संकट देखील नष्ट करू शकू. आपण कोरोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी करोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

कोरोनाला पराभूत करायचं असेल, तर प्रत्येक देशातली किमान ७० टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य पूर्ण करायला हवे. २०२२ च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, जगभरात प्रत्येक देशाने व्यापक लसीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विकसित किंवा काही विकसनशील देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वाढले आहे. मात्र, मागास देशांमध्ये अद्याप पुरेसा लसींचा साठा पोहोचलेला नाही. लसींचा साठा असला, तरी तिथल्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *