Breaking News

केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हॅलेंनटाईन डे भेट: आता चाचणी आवश्यक नाही सेल्फ डिक्लरेशन आणि लस प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे

मराठी ई-बातम्या टीम

आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून आता भारतात येण्याऱ्यासाठी आता केंद्रीय आरोग्य विभागाने नवी नियमावली तयार केली असून या नव्या नियमावलींची अंमलबजावणी व्हेलेंनटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली.

आता ७२ तास आरटीपीसीआरची चाचणी करणे आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह असण्याची बंधनकारक अट रद्द करण्यात आली आहे. तसेच त्याऐवजी प्रवाशांनी सेल्फ डिक्लरेशन आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले असून १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनची अटही आता रद्द करण्यात आली आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आपल्या नव्या नियमावलीत जाहीर केले.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना यापूर्वी भारतात आल्यानंतर ७ ते १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये रहावे लागत होते. तसेच ७२ तास आधी कोरोना तपासणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता या नियमात बदल करण्यात आला असून या नव्या नियमानुसार प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टलवर मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यायची असून लस घेतल्याचे प्रमाणपत्र त्यावर अपलोड करायचे आहे. जर लस घेतली नसेल किंवा त्यांचे दोन मात्रा घेतली नसेल तर ७२ तास आधी कोरोना चाचणीचा अहवाल अपलोड करायचा आहे.

विमान प्रवासादरम्यान कोविड नियमाचे पालन करायचे आहे. प्रवाशांना विमानात प्रवेश देताना त्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीला लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तीला विमानतळावर उतरवून त्यांना पुढील उपचारासाठी आरोग्य विभागात दाखल करायचे आहे. हा नियम विमानप्रवाशांबरोबरच समुद्रीमार्गे आणि जमिनीवरील सीमावर्ती भागातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हाच नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून करण्यात येणार आहे.

कोरोना चाचणीच्नया अनुषंगाने नवी नियमावली:-

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *