Breaking News

राज्यात आज ओमायक्रोनचे ८ रूग्ण पुन्हा आढळले पुण्यात ६ तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक

मराठी ई-बातम्या टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
आतापर्यंत मुंबई – १४, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण-६, पुणे मनपा -२ , कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ या भागात रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत. या ८ रुग्णांपैकी सर्व रुग्ण पुरुष आहेत. त्यांचा वयोगट – २९ वर्षे ते ४५ वर्षे यातील असून त्यातील ७ रुग्ण लक्षणे विरहित तर १ रुग्ण सौम्य स्वरुपाचा आहे. प्राथमिक माहितीनुसार या पैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई प्रवास, आणि २ रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील १ रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील १ रुग्णांचा नाजेरिया प्रवास आहे. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. सर्व रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

Check Also

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *