Breaking News

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटींपेक्षा अधिक मदत निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटींपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.

जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत, ऑगस्ट – २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर – ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर – २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर -५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर -१०१३ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना विक्रमी ८ कोटी ८९ लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात

धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *