Breaking News

आता नागपूरातही आढळला ओमायक्रॉनचा रूग्ण तर ९ जण घरी ९ रूग्ण अॅक्टीव्ह

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात मुंबईसह कल्याण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रोनचे १७ रूग्ण आढळून आल्यानंतर आज नागपूरमध्ये एक रूग्ण सापडला असून हा रूग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेहून नागपूरात आला होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

तर १७ पैकी ९ ओमायक्रोन बाधित रूग्णांमध्ये आता विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने आणि त्यांची आरपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्याने या ९ नऊ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील दोन लहान मुलांना आणि पुण्यातील एकासह इतरांचा समावेश आहे.

नागपूरात आढळून आलेला रूग्ण हा ४० वर्षिय असून त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत  या रूग्णाच्या अतिनिकटतमच्या सहवासात ३० व्यक्ती आल्या होत्या. मात्र त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे नागपूरात आढळून आलेला व्यक्तीने कोणतीही लस घेतलेली नाही. आतापर्यंत राज्यात ओमायक्रोनच्या रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईत ५, पिंपरी चिंचवड १०, कल्याण डोंबिवली १ आणि आज नागपूरमध्ये १ असे १८ रूग्ण आढळून आले आहेत.

Check Also

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *