Breaking News

राज्यात ओमायक्रोन रूग्णांची संख्या १७ वरः मुंबईत आढळले तीन रूग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ रूग्ण सापडले

मराठी ई-बातम्या टीम
कल्याण, पिंपरी चिंचवड नंतर आता ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव मुंबईतही झाला असून मुंबईत आज एकदम तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती पुढे आली असून हे तिघेही दक्षिण आफ्रिका खंडातील देशातून प्रवास करून आलेले होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे आणखी ७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.
आज मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष असून त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका-नैरोबी या देशांमध्ये प्रवास केलेला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आढललेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत.
आज आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकर्ण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *