Breaking News

आज पुन्हा ओमायक्रॉनचे ८ रूग्ण, तर विषाणूचा शिरकाव आता साताऱ्यातही मुंबई विमानतळावर ४, पुणे १ तर साताऱ्यात ३

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवस मुंबई, पुणे, मुंबई महानगरात आढळून येणारे ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण आता राज्यातील नागपूर, उस्मानाबाद येथे आढळून आल्यानंतर आज थेट साताऱ्यातही आढळून आला आहे. साताऱ्यात तब्बल तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण हे मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रात आढळून आला आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३, सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१   नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ येथे रूग्ण आढळून आलेले आहेत. तर यापैकी २८ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

मुंबईत ४ रुग्ण -मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. तर इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी द. आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.

सातारा येथील ३ रुग्ण –हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे.

पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.

Check Also

मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *