Breaking News

कोरोना: २ री लाट आटोक्यात तर १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्क्यांचे लसीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर झाली चर्चा

मुंबई: प्रतिनिधी

सततच्या निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळून आले. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा तर विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १०० पेक्षा कमी बाधित आढळून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या सदस्य परिस्थितीवर चर्चा करताना ही माहिती सर्वांसमोर मांडण्यात आली. तसेच १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्के जणांचे लसीकरण झालेले आहे.

सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग हे आहेत. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे. तसेच गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापी, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

दिवस अखेर आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण – ६४ लाख १ हजार २१३.बरे झालेले रुग्ण – ६२ लाख १ हजार १६८. एकूण मृत्यू – १ लाख ३५ हजार २५५. सक्रीय रुग्ण संख्या – ६१ हजार ३०६. रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के. आज रोजी ५ हजार १३२ नवे बाधित, ८ हजार १९६ बरे झाले तर १५८ जणांचा मृतकांची नोंद झाली आहे.

राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.  राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.

तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.  राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २८५ ७४०००७ १५९३०
ठाणे ३१ ९९५६९ २१६०
ठाणे मनपा ४९ १३९४९३ २२ २०९१
नवी मुंबई मनपा ५८ ११६२२५ १९२४
कल्याण डोंबवली मनपा ४५ १४८२२० २७३२
उल्हासनगर मनपा २१४१७ ६३९
भिवंडी निजामपूर मनपा १११०२ ४८२
मीरा भाईंदर मनपा २५ ५७४६१ ११८५
पालघर १४ ५५४१६ १२२३
१० वसईविरार मनपा ३४ ७८६७० २०५१
११ रायगड ८७ ११३४३४ ३०४२
१२ पनवेल मनपा ५१ ७३३६१ १३३०
ठाणे मंडळ एकूण ६८६ १६५४३७५ ३८ ३४७८९
१३ नाशिक ४० १५९३१५ ३६३८
१४ नाशिक मनपा ३५ २३४८८० ४५९८
१५ मालेगाव मनपा १००९३ ३३६
१६ अहमदनगर ६८० २३३६७६ ३० ४७९९
१७ अहमदनगर मनपा २८ ६६५१५ १५८३
१८ धुळे २६२६० ३६४
१९ धुळे मनपा २००१८ २९६
२० जळगाव १०६९७८ २०२५
२१ जळगाव मनपा ३२८६० ६५३
२२ नंदूरबार ३९९७१ ९४७
नाशिक मंडळ एकूण ७८८ ९३०५६६ ३४ १९२३९
२३ पुणे ७०१ ३३८२३२ १३ ६४००
२४ पुणे मनपा २९६ ५०८०९९ ८९३३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७५ २६०२५० ३४४६
२६ सोलापूर ७५६ १६५७९६ ३६२६
२७ सोलापूर मनपा ३२९४४ १४५५
२८ सातारा ६१५ २३१४२४ २२ ५६०९
पुणे मंडळ एकूण २५५१ १५३६७४५ ४७ २९४६९
२९ कोल्हापूर १६६ १५१७७२ ४४३८
३० कोल्हापूर मनपा ५४ ५००५४ १२८५
३१ सांगली ३६१ १५२८७४ ३९९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ९३ ४३२६२ १३०६
३३ सिंधुदुर्ग ५७ ४९९३१ १२८४
३४ रत्नागिरी १३० ७४४६१ १२ २२१०
कोल्हापूर मंडळ एकूण ८६१ ५२२३५४ ३२ १४५२०
३५ औरंगाबाद १३ ६१३६७ १९०१
३६ औरंगाबाद मनपा ९३३२६ २३२८
३७ जालना १५ ६०३७९ ११९५
३८ हिंगोली १८४३५ ५०३
३९ परभणी ३४०६९ ७८५
४० परभणी मनपा १८२१९ ४३९
औरंगाबाद मंडळ एकूण ३५ २८५७९५ ७१५१
४१ लातूर १७ ६७९७१ १७७६
४२ लातूर मनपा २३३२५ ६३३
४३ उस्मानाबाद ४९ ६५४९५ १८६४
४४ बीड १०२ १००३१६ २६७४
४५ नांदेड ४६६०१ १६२२
४६ नांदेड मनपा ४४१०६ १०३५
लातूर मंडळ एकूण १७७ ३४७८१४ ९६०४
४७ अकोला २५४७७ ६५४
४८ अकोला मनपा ३३१७७ ७६९
४९ अमरावती ५२३७५ ९९२
५० अमरावती मनपा ४३६६४ ६०६
५१ यवतमाळ ७६२२९ १७९१
५२ बुलढाणा १२ ८४९३२ ७७६
५३ वाशिम ४१६३७ ६३४
अकोला मंडळ एकूण २० ३५७४९१ ६२२२
५४ नागपूर १२९४७२ ३०५५
५५ नागपूर मनपा ३६३६२५ ६०४५
५६ वर्धा ५८३४८ १२१६
५७ भंडारा ६००४६ ११२२
५८ गोंदिया ४०५३६ ५७१
५९ चंद्रपूर ५९२११ ११२८
६० चंद्रपूर मनपा २९५१४ ४८९
६१ गडचिरोली ३०३०७ ६७७
नागपूर एकूण १४ ७७१०५९ १४३०३
इतर राज्ये /देश १४६ ११६
एकूण ५१३२ ६४०६३४५ १५८ १३५४१३

 

Check Also

आरोग्य मंत्र्यांची ग्वाही, नव्या रूग्णवाहिका देणार, तर हजार गाड्यांचे फ्लिट बदलणार वाहन चालकांचे वेतन लवकरच देणार – टोपे

राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत पगार लवकरच मिळणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published.