Breaking News

अहमदनगर मधील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक

अहमदनगर-मुंबई: प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

अतिदक्षता अर्थात आयसीयुत एकूण १७ जणांवर उपचार सुरु होते. त्यातील १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्यातील दिवाळी सणावर दु:खाचे सावट पसरले आहे. या दुर्घटनेबद्दल स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रूग्णालयाला जबाबदार धरले असून फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत हलगर्जीपणाबद्दल संबधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते.

या आगीबद्दल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचाव कार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसेच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल.

अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार असल्याचे अहमगनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

विशेष म्हणजे चंद्रपूर येथील  जिल्हा दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर आताची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आदेश देवूनही योग्य पध्दतीचे फायर ऑडिट करण्यात आले नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *