Breaking News

चिंता वाढली: राज्यात आणखी ओमायक्रॉनचे ७ रूग्ण सापडले पुण्यात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम

काल डोंबिवलीत केपटाऊनमधून आलेल्या ३३ वर्षिय युवक ओमायक्रॉनबाधित आढळून आल्यानंतर आज पुणे येथील एकजण तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ असे एकूण सात जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून त्यांच्या अहवाल पुणे प्रयोगशाळेतून आज मिळाला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांची संख्या ८ वर पोहचली.

मागील महिन्याच्या २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायझेरियातील लेगॉस शहरातून एक ४४ वर्षिय महिला पिंपरी-चिंचवड येथील आपल्या भावाला भेटण्यासाठी आली. तिच्या सोबत तिच्या दोन मुलीही आल्या. सदर महिला, तिच्या मुली आणि तिचा भाऊ व त्याच्या दोन मुली यांना कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पुणे येथील एका ४७ वर्षिय पुरूषालाही या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सातही जणांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज दिल्यानंतर या सर्व ७ ही जणांना ओमायक्रोन या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

नायजेरीयन नागरीक असलेली महिला ४४ वर्षिय तर तीच्या मुली १२ आणि १८ वर्षाच्या आहेत. तर तीचा भाऊ आणि भावाच्या दिड आणि ७ वर्षाच्या मुलींशी निकटसहवास संबध आल्याने तिच्या भावाला आणि त्याच्या मुलींना ओमायक्रोनची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले.

यातील त्या ४४ वर्षिय महिलेला ओमायक्रोन विषाणूची सौम्य लक्षणे असून इतरांना कोणतीही लक्षणे नाहीत. या तिघे जण १८ वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. तर दोघांनी कोविशिल्डची तर एकाने कोवॅक्सीनची लस घेतली आहे. या सर्वांना पिंपरी येथील जिजामाता रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुण्यात आढळून आलेल्या ओमायक्रोनचा रूग्ण हा नेहमीच्या सर्व्हेक्षणात आढळून आला आहे. हा रूग्ण १८ ते २४ नोर्व्हेबर दरम्यान फिनलँड येथे गेला होता. २९ तारखेला त्याला ताप आल्याने त्याने चाचणी केली असता तो ओमायक्रोन बाधित असल्याचे आढळून आले. या रूग्णानेही कोविशिल्डच्या दोन्ही लसींचे डोस घेतलेले आहेत. त्याला कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नसून त्याची प्रकृती स्थिर आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसू लागतात ही लक्षणे मधुमेह टाळण्यासाठी काय करावे

मधुमेह होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *