Breaking News

इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणते भारतात चीनी कोरोना व्हेरियंटचे ४ रूग्ण पण काळजी करण्याचे कारण नाही

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान, फ्रांस, ब्राझील आदी देशांमध्ये २४ तासात ५.३७ लाख कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर भारतात नव्याने १४५ रूग्ण आढळून आले असून यापैकी ४ रूग्ण हे चीनी कोरोना व्हेरियंट BF-7 चे आढळून आले आहेत. चीनी व्हेरियटंचे रूग्ण आढळून आल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आले असून रूग्ण सेवा तैनात ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिध्दी पत्रकान्वये जाहिर केले आहे. मात्र भारतात अद्यापही चिंताजनक परिस्थिती नसून काळाजी करण्याचे कारण नाही, मात्र कोविड अॅप्रोपियट बिहेव्हिअर पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

परदेशातील कोविडच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यापूर्वीच केंद्र सरकारने शासकिय आणि खाजगी संस्थांना देण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाचा संसर्ग वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली तर सर्व खाजगी आणि शासकिय रूग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यास किंवा तशी तयारी करण्याच्या सूचनाही इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्व संस्थांना कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर इंडियन मे़डिकल असोसिएशने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली असून ती खालीलप्रमाणे आहेत.
मार्गदर्शक तत्वे….

१) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा…
२) सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर पाळा
३)रोज साबणाने, पाण्याने, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा..
४) सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्यासारखी ठिकाणे टाळा लग्नकार्य, राजकिय, सामाजिक गर्दीचे कार्यक्रम.
५) आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा,
६) ताप आलेला असेल, घशाचा त्रास, कफ, लूस मोशन आदी गोष्टी होत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
७) कोरोनाची लस घेतली नसेल तर ती घ्या.
८) तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा

आदी गोष्टींचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.

Check Also

केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी दिला ‘हा’ इशारा दुर्लक्ष करू नका लस घ्या

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काही ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *