Breaking News

आरोग्य मंत्र्यांची ग्वाही, नव्या रूग्णवाहिका देणार, तर हजार गाड्यांचे फ्लिट बदलणार वाहन चालकांचे वेतन लवकरच देणार – टोपे

राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत पगार लवकरच मिळणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे पद सोडल्यास इतर कर्मचारी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात. रुग्णवाहिकेचे चालक म्हणून कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद केली असून ३६ कोटींचे वितरण ताबडतोब होईल. यापुर्वी थकलेले १० कोटी आणि नव्याने २६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी याबाबत विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देत असताना टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्यात १०९ रुग्णवाहिकांची अवस्था वाईट झाली असून त्यात दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी उत्तर देताना टोपे म्हणाले की, १०२ या क्रमांकाच्या नवीन रुग्णवाहिका आपण ग्रामीण भागात देत आहोत. तसेच १०८ रुग्णवाहिकेत बदल करण्याचा शासनाचा विचार असून एक हजार रुग्णवाहिकेची फ्लिट बदलण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार निधीतून शववाहिका आणि रुग्णवाहिका चालवल्या जातात त्याच्या डिझेल आणि चालकाच्या पगाराची सोय राज्य सरकारकडून केली जाईल का? असा प्रश्न भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. यावर टोपे यांनी होय असे उत्तर दिले.

रुग्णवाहिकेच्या चालकांप्रमाणेच कोरोना काळात काम केलेल्या सफाई कर्मचारी यांचे पगार होणार का? असा प्रश्न प्रकाश आबिटकर यांनी विचारला असता ते म्हणाले की, पुरवणी मागण्याद्वारे जी तरतूद केली आहे ती आठ दिवसांच्या आत रिलीज व्हावी, असे निर्देश सचिवांना दिले आहेत.

राज्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला १५,८०० रुपये पगार मिळायला हवा. तसेच पीएफ आणि ईएसआयएसची सुविधाही कंत्राटदाराने करायला हवी. जर तशी तरतूद केली नसेल तर कंत्राटदारावर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी वाहन चालक कंत्राटदारांना दिला.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *