Breaking News

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट चे उद्घाटन

वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर “जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट”चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड – पाटील, प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त राजीव निवतकर म्हणाले, रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य तसेच मौखिक आरोग्यामध्ये कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिवस साजरा केला जातो.

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धा, क्रॉसवर्ड कोडे, सर्जनशीलता, स्लोगन स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दंत चिकित्सामध्ये कृत्रिम दंतशास्त्रांचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण जागरूकतेसाठी कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध उपचारांबद्दल माहितीपत्रकांचे प्रकाशन करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *