Breaking News

मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ ओमायक्रॉन ३४ तर कोरोनाबाधित २४४५ इतके रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम

नववर्षाचे आगमन जसे जसे जवळ येत आहे तस तसे मुंबईसह राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रूग्ण राज्यात आढळून आले तर त्यापैकी ३४ रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. तर राज्यात कोरोनाबाधित ३ हजार ९०० इतके रूग्ण आढळून आले असून त्यापैकी २४४५ इतके रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे दिसून येत असल्याने नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

राज्यात आज कोरोनाबाधित १३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६१% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,९०० नवीन रुग्णांचे निदान झाले असून  २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८७,६८,७६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६६,६५,३८६ (९.६९  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,२२,९०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

तर आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत. एनआयव्हीने रिपोर्ट केले ४७ रुग्णांमध्ये ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत. एकूण आढळून आलेल्या रुग्णांपैकी मुंबईत -३४, नागपूर आणि पिंपरी चिंचवड  – प्रत्येकी ३, नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी २, पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी १

आयएसआर संस्थेने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. मुंबई -१९, कल्याण डोंबिवली -५, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड  – प्रत्येकी ३, वसई विरार आणि पुणे मनपा – प्रत्येकी २, पुणे ग्रा. , भिवंडी निजामपूर , पनवेल, ठाणे मनपा – प्रत्येकी १

  • आजपर्यंत राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई १३७*
पिंपरी चिंचवड २५
पुणे ग्रामीण १८
पुणे मनपा ११
ठाणे मनपा
नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली प्रत्येकी ७
नागपूर
सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी ५
वसई विरार
१० औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी २
११  लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर,  कोल्हापूर प्रत्येकी १
  एकूण २५२
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहे. ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.  तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २४४५ ७७५४७६ १६३७५
ठाणे ४७ १०१४२३ २२३२
ठाणे मनपा १५६ १४५९९० २१२४
नवी मुंबई मनपा १७७ १२२६४७ २०११
कल्याण डोंबवली मनपा ५२ १५३७४७ २८७३
उल्हासनगर मनपा १६ २२१०१ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ११३३६ ४८९
मीरा भाईंदर मनपा ८५ ६०३१८ १२०५
पालघर १० ५६५९१ १२३४
१० वसईविरार मनपा ८१ ८२७२१ २०८६
११ रायगड २५ ११८८९२ ३३९०
१२ पनवेल मनपा ७६ ७८८१७ १४३५
ठाणे मंडळ एकूण ३१७३ १७३००५९ ३६११७
१३ नाशिक १० १६४६१३ ३७५८
१४ नाशिक मनपा ५८ २३८५६६ ४६५६
१५ मालेगाव मनपा १०१६५ ३३६
१६ अहमदनगर ५१ २७४६६५ ५५२१
१७ अहमदनगर मनपा ६८९५० १६३६
१८ धुळे २६२१७ ३६२
१९ धुळे मनपा १९९६२ २९४
२० जळगाव १०७०२४ २०५९
२१ जळगाव मनपा ३२८९२ ६५७
२२ नंदूरबार ४००२० ९४८
नाशिक मंडळ एकूण १३१ ९८३०७४ २०२२७
२३ पुणे ८४ ३६९५८४ ७०३३
२४ पुणे मनपा २३९ ५२५८३८ ९२५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८३ २७१११५ ३५२५
२६ सोलापूर १४ १७८७२४ ४१३०
२७ सोलापूर मनपा ३२७३६ १४७५
२८ सातारा २१ २५१६२५ ६४९६
पुणे मंडळ एकूण ४४४ १६२९६२२ १० ३१९१५
२९ कोल्हापूर १० १५५४२२ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १० ५१५९६ १३०६
३१ सांगली १६४४२८ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४५ ४५८६१ १३५२
३३ सिंधुदुर्ग ५३०३१ १४४८
३४ रत्नागिरी १४ ७९१९५ २४९६
कोल्हापूर मंडळ एकूण ८२ ५४९५३३ १५४२६
३५ औरंगाबाद ६२६०१ १९३५
३६ औरंगाबाद मनपा ९३५२१ २३२९
३७ जालना ६०८३० १२१५
३८ हिंगोली १८४८९ ५०८
३९ परभणी ३४१९६ ७९३
४० परभणी मनपा १८२६६ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १३ २८७९०३ ७२२३
४१ लातूर ६८४९७ १८०१
४२ लातूर मनपा २३८८१ ६४३
४३ उस्मानाबाद ६८१३७ १९८६
४४ बीड १०४१७४ २८४०
४५ नांदेड ४६५४७ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९६१ १०३४
लातूर मंडळ एकूण १६ ३५५१९७ ९९३०
४७ अकोला २५५४० ६५५
४८ अकोला मनपा ३३२९१ ७७३
४९ अमरावती ५२५०३ ९८९
५० अमरावती मनपा ४३८०८ ६०९
५१ यवतमाळ ७६०४६ १८००
५२ बुलढाणा ८५६५० ८१०
५३ वाशिम ४१६८३ ६३७
अकोला मंडळ एकूण ३५८५२१ ६२७३
५४ नागपूर १२९५९९ ३०७५
५५ नागपूर मनपा २४ ३६४३२९ ६०५४
५६ वर्धा ५७३६५ १२१८
५७ भंडारा ५९९९७ ११२४
५८ गोंदिया ४०५२५ ५७०
५९ चंद्रपूर ५९३९२ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६४९ ४७६
६१ गडचिरोली ३०४७७ ६६९
नागपूर एकूण ३४ ७७१३३३ १४२७४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३९०० ६६६५३८६ २० १४१४९६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *