अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिझी
मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले.
आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १३३८ रुग्ण बरे होवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

About Editor

Check Also

Medical Expense

भारतातील ९०% कफ सिरपमध्ये त्रुटी कफ सिरफने लहान मुलांच्या मृत्यूमध्ये वाढ

भारताच्या औषध नियामकाने देशातील जवळपास ९०% कफ सिरप उत्पादकांची तपासणी केली आहे आणि त्यात अनुपालनातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *