Breaking News

कोरोना: राज्यात बाधितांच्या संख्येत घट मात्र अहमदनगरमध्ये सर्वाधिक नवे बाधित ३ हजार ७४१, ४ हजार ६४१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रात काल ४ हजार ६६५ इतकी कोरोना बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज एकदम त्यात एक हजारांची घट होत ३ हजार ७४१ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रूग्ण एकट्या अहमदनगर जिल्ह्यात आढळून आले असून ७७० इतके बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात ४२६ आणि साताऱ्यात ४४६, सोलापूरात ३८२ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या ११ जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती होती. त्या जिल्ह्यात अर्थात सांगलीमध्ये २३७, रत्नागिरीत ६९, सिंधुदूर्गात ५३ कोल्हापूरात ८६ इतके कमी रूग्ण आढळून आले आहेत.

मागील २४ तासात ४ हजार ६९६  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत एकूण ६२ लाख ६८ हजार ११२ वर घरी जाणाऱ्यांची संख्या पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३८ लाख १२ हजार ८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६० हजार ६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३,७४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६०,६८०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३३३ ७४३८३२ १५९७६
ठाणे ४० १०००१६ २१६९
ठाणे मनपा ४६ १४००२० २०९५
नवी मुंबई मनपा ४२ ११६८८९ १९५५
कल्याण डोंबवली मनपा ३५ १४८८९५ २७६५
उल्हासनगर मनपा २१४९९ ६४४
भिवंडी निजामपूर मनपा १११२० ४८४
मीरा भाईंदर मनपा १८ ५७७५२ ११८८
पालघर ५५५२४ १२२५
१० वसईविरार मनपा २७ ७८९८८ २०६७
११ रायगड ३९ ११४४३८ ३०७८
१२ पनवेल मनपा ६१ ७४०७१ १३४४
ठाणे मंडळ एकूण ६५० १६६३०४४ १४ ३४९९०
१३ नाशिक ५३ १५९९२२ ३६५१
१४ नाशिक मनपा २६ २३५२३८ ४५९३
१५ मालेगाव मनपा १०१०० ३३५
१६ अहमदनगर ७७० २४१६०१ ४९३८
१७ अहमदनगर मनपा ३८ ६६७७७ १५९८
१८ धुळे २६२६४ ३६३
१९ धुळे मनपा २००२१ २९१
२० जळगाव १०७०११ २०४९
२१ जळगाव मनपा ३२८६७ ६५६
२२ नंदूरबार ३९९७८ ९४७
नाशिक मंडळ एकूण ८८८ ९३९७७९ १९४२१
२३ पुणे ४२६ ३४४८४१ ६६३५
२४ पुणे मनपा १६८ ५११११७ ९०८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८३ २६२०१७ ३४६६
२६ सोलापूर ३८२ १७१७४१ १९ ३७७४
२७ सोलापूर मनपा ३३०३२ १४६१
२८ सातारा ४४६ २३८२५८ ५९९३
पुणे मंडळ एकूण १५१२ १५६१००६ २२ ३०४१८
२९ कोल्हापूर ८६ १५३४४५ ४४८९
३० कोल्हापूर मनपा २२ ५०४५४ १२९५
३१ सांगली २३७ १५७५५५ ४१३८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५४ ४४०९३ १३२६
३३ सिंधुदुर्ग ५३ ५०५८२ १३३८
३४ रत्नागिरी ६९ ७५६२२ २२९७
कोल्हापूर मंडळ एकूण ५२१ ५३१७५१ १२ १४८८३
३५ औरंगाबाद ६१५०४ १९४२
३६ औरंगाबाद मनपा १५ ९३४५७ २३३८
३७ जालना ६०४०६ १२०२
३८ हिंगोली १८४४७ ५०४
३९ परभणी ३४०९४ ७८६
४० परभणी मनपा १८२२१ ४४०
औरंगाबाद मंडळ एकूण २७ २८६१२९ ७२१२
४१ लातूर ६८०९५ १७८३
४२ लातूर मनपा २३३८९ ६३५
४३ उस्मानाबाद २९ ६६१६९ १८९१
४४ बीड ७५ १०१४६० २७०५
४५ नांदेड ४६६२८ १६२२
४६ नांदेड मनपा ४४११६ १०३३
लातूर मंडळ एकूण ११३ ३४९८५७ ९६६९
४७ अकोला २५४८५ ६५४
४८ अकोला मनपा ३३१८९ ७६८
४९ अमरावती ५२४२५ ९८७
५० अमरावती मनपा ४३६८८ ६०६
५१ यवतमाळ ७६२५३ १८०८
५२ बुलढाणा १४ ८५०५२ ७७९
५३ वाशिम ४१६५९ ६३५
अकोला मंडळ एकूण २१ ३५७७५१ ६२३७
५४ नागपूर १२९४७६ ३०७८
५५ नागपूर मनपा ३६३६६७ ६०५३
५६ वर्धा ५८३५३ १२१६
५७ भंडारा ६००५६ ११२३
५८ गोंदिया ४०५४१ ५७०
५९ चंद्रपूर ५९२५६ १०८६
६० चंद्रपूर मनपा २९५२२ ४७३
६१ गडचिरोली ३०३४६ ६६९
नागपूर एकूण ७७१२१७ १४२६८
इतर राज्ये /देश १४६ १११
एकूण ३७४१ ६४६०६८० ५२ १३७२०९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *