Breaking News

कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली १८ हजार ६०० नवे बाधित, २२ हजार ५३२ बरे झाले तर ४०४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील जवळपास दोन महिने सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून २० ते ३० हजारा दरम्यान बाधित राज्यात आढळून येत होते. मात्र आज २० हजाराच्या आत अर्थात १८ हजार ६०० रूग्ण आढळून आले असून मागील काही दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद झाली. तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण २ लाख ७१ हजार ८०१ इतकी झाली.

आज २२,५३२ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० इतके बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५५% एवढे झाले आहे. तर ४०४ बाधितांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख ९८ हजार ९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६२ ७०४६२२ २२ १४७९७
ठाणे १७२ ९७८१७ १४२४
ठाणे मनपा १४७ १३१९७३ १७९६
नवी मुंबई मनपा ११४ १०७९६८ १५८९
कल्याण डोंबवली मनपा १६० १४०००४ १६१४
उल्हासनगर मनपा ५४ २०४६१ ४६३
भिवंडी निजामपूर मनपा १२ १०८२१ ४४३
मीरा भाईंदर मनपा ९६ ५३४९३ ८८७
पालघर ३६८ ४५७११ ५७१
१० वसईविरार मनपा २५२ ६९२०९ १२५२
११ रायगड ५५२ ८४५९८ १७२५
१२ पनवेल मनपा १२१ ६३७७८ १११०
ठाणे मंडळ एकूण ३११० १५३०४५५ ३८ २७६७१
१३ नाशिक ४१६ १४७२४९ १५ २१४७
१४ नाशिक मनपा १८९ २२८३४३ २२७४
१५ मालेगाव मनपा १० ९९१३ २३७
१६ अहमदनगर १०१३ १८६५३५ २८ २१०६
१७ अहमदनगर मनपा ६२ ६३९५३ ९८५
१८ धुळे ४३ २५२८२ २७४
१९ धुळे मनपा ४२ १९४०९ २३५
२० जळगाव १३५ १०४२४४ १७८४
२१ जळगाव मनपा १३ ३२५१६ ५७६
२२ नंदूरबार २४ ३८७४५ ८२३
नाशिक मंडळ एकूण १९४७ ८५६१८९ ५८ ११४४१
२३ पुणे १२७६ २८८३५८ १८ ३९८२
२४ पुणे मनपा ५२६ ४८४३१३ ६७२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३८५ २४३४३८ १७०४
२६ सोलापूर ७४८ १२९२४४ २४ २७९६
२७ सोलापूर मनपा २७ ३१६२८ १३७१
२८ सातारा १८५५ १६३६९० १७ ३०९४
पुणे मंडळ एकूण ४८१७ १३४०६७१ ६९ १९६७४
२९ कोल्हापूर १२४६ ८२६४६ ५९ २७१९
३० कोल्हापूर मनपा ४५० २९६७९ १५ ७४३
३१ सांगली ९०३ ९३६१७ १७ २०५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१० ३१५८१ ८९९
३३ सिंधुदुर्ग ६५८ २५९१७ १२ ६५२
३४ रत्नागिरी ६५८ ४३७९४ १५ १०८४
कोल्हापूर मंडळ एकूण ४१२५ ३०७२३४ १२५ ८१४८
३५ औरंगाबाद १६७ ५५३७९ ९१०
३६ औरंगाबाद मनपा ८७ ९१५४४ १९११
३७ जालना १४९ ५८१३२ ९२०
३८ हिंगोली ५० १७७४९ ३३६
३९ परभणी १८१ ३२६९५ ५५७
४० परभणी मनपा १६ १७९३९ ३७९
औरंगाबाद मंडळ एकूण ६५० २७३४३८ १६ ५०१३
४१ लातूर १२८ ६६३६८ १३ १२७४
४२ लातूर मनपा ४६ २२८२५ ४८९
४३ उस्मानाबाद २४० ५७३०० १३२५
४४ बीड ५१३ ८६९५७ १० १८८६
४५ नांदेड ४७ ४५८१२ १३५२
४६ नांदेड मनपा ४३६९४ ८५९
लातूर मंडळ एकूण ९७६ ३२२९५६ ४४ ७१८५
४७ अकोला ८७ २३८५२ ३६७
४८ अकोला मनपा ६० ३२३०३ ५४०
४९ अमरावती ३७२ ४७८२२ १३ ८७२
५० अमरावती मनपा ८२ ४२००४ ५३१
५१ यवतमाळ ३४६ ७३३५२ १३७६
५२ बुलढाणा ६८७ ८०८४३ ४८७
५३ वाशिम १५० ३९७४३ ५८२
अकोला मंडळ एकूण १७८४ ३३९९१९ २३ ४७५५
५४ नागपूर १२१ १२७९३७ १६८७
५५ नागपूर मनपा २०२ ३६१५७४ ४८७८
५६ वर्धा २३४ ५७८५२ १००७
५७ भंडारा १३३ ५९२२३ ९५०
५८ गोंदिया ७० ३९९७७ ४६०
५९ चंद्रपूर २३३ ५७०१२ ९३८
६० चंद्रपूर मनपा ५७ २८८९२ ४५०
६१ गडचिरोली १४१ २८३४० १५ ४६९
नागपूर एकूण ११९१ ७६०८०७ २९ १०८३९
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण १८६०० ५७३१८१५ ४०२ ९४८४४

आज नोंद झालेल्या एकूण ४०२ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४१२ ने वाढली आहे. हे ४१२ मृत्यू, पुणे-६८, लातूर-५४, पालघर-४०, नाशिक-२९, भंडारा-२७, कोल्हापूर-२५, सातारा-२०, अहमदनगर-१८, औरंगाबाद-१५, गडचिरोली-१५, नांदेड-१३, रत्नागिरी-१२, गोंदिया-११, नागपूर-११, सांगली-११, सोलापूर-९, ठाणे-९, हिंगोली-५, चंद्रपूर-४, जळगाव-४, बीड-३, बुलढाणा-३, नंदूरबार-३, परभणी-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *