Breaking News

९ दिवसानंतर कोरोना बाधितांची संख्येत घट: पण मुंबईसह उपनगरात संख्या चढीच मुंबईसह उपनगरात २३ हजार तर ओमायक्रॉन ३१

मराठी ई-बातम्या टीम

जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाढीला लागलेली कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढ काल स्थिरावल्यानंतर आज त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मुंबईसह उपनगरात जवळपास २३ हजार संख्या आढळून आलेली आहे. तर राज्यात ३३ हजार ४७० रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज १३ हजार ६४८ आणि उपनगरात १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्यातही १० हजार रूग्ण आढळून आले आहेत.

याशिवाय आज दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात दिवसभरात आज २९ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९५% एवढे झाले आहे. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६९,५३,५१४ (९.८३  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र राज्यात होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून सध्या राज्यात १२ लाख ४६ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्यांची संख्या चिंता करायला लावणारी आहे.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ३१ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. आज राज्यात ओमायक्रॉनचे पुणे मनपा – २८, पुणे ग्रामीण -२, पिंपरी चिंचवड –१ आदी ठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३६४८ ९२६१७० १६४११
ठाणे ७०२ १०७०१० २२३४
ठाणे मनपा २४२३ १६४९२२ २१२४
नवी मुंबई मनपा २०२० १३९२९८ २०१४
कल्याण डोंबवली मनपा ११९२ १६२४८४ २८७३
उल्हासनगर मनपा २८८ २३६९० ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १३१ ११९९८ ४८९
मीरा भाईंदर मनपा ९४० ६८४२० १२०६
पालघर १०९ ५८२३० १२३४
१० वसईविरार मनपा ७७८ ९०१४७ २०९३
११ रायगड ४१७ १२२६७४ ३३९३
१२ पनवेल मनपा ११६३ ८६७९५ १४३७
ठाणे मंडळ एकूण २३८११ १९६१८३८ ३६१७१
१३ नाशिक ३४८ १६६०४७ ३७६१
१४ नाशिक मनपा ६४९ २४२९८३ ४६६२
१५ मालेगाव मनपा २३ १०२१६ ३३६
१६ अहमदनगर १४४ २७५६०७ ५५३०
१७ अहमदनगर मनपा ९१ ६९४४२ १६३६
१८ धुळे २६३०४ ३६२
१९ धुळे मनपा ३६ २००८९ २९४
२० जळगाव ५५ १०७३३६ २०५९
२१ जळगाव मनपा २३ ३३०३८ ६५७
२२ नंदूरबार ४५ ४०१५५ ९४८
नाशिक मंडळ एकूण १४२१ ९९१२१७ २०२४५
२३ पुणे ८१२ ३७४५१६ ७०४८
२४ पुणे मनपा ३०९८ ५४५७१३ ९२८०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२४६ २७८३०६ ३५२८
२६ सोलापूर ३८ १७९०६९ ४१४२
२७ सोलापूर मनपा ५८ ३३००८ १४७५
२८ सातारा ३५६ २५३४८३ ६५००
पुणे मंडळ एकूण ५६०८ १६६४०९५ ३१९७३
२९ कोल्हापूर ५५ १५५७५२ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १३२ ५२२५८ १३०६
३१ सांगली ५६ १६४८१९ ४२८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४९ ४६२८५ १३५३
३३ सिंधुदुर्ग ९० ५३५०३ १४४९
३४ रत्नागिरी ६४ ७९८९४ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ४४६ ५५२५११ १५४३१
३५ औरंगाबाद २७ ६२८३३ १९३५
३६ औरंगाबाद मनपा २३४ ९४४७६ २३२९
३७ जालना ६३ ६१०३३ १२१५
३८ हिंगोली १५ १८५५१ ५०८
३९ परभणी ३४ ३४३२७ ७९३
४० परभणी मनपा २२ १८४०१ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ३९५ २८९६२१ ७२२३
४१ लातूर १०० ६८९०५ १८०३
४२ लातूर मनपा ५१ २४१३३ ६४५
४३ उस्मानाबाद २४ ६८४८८ १९९०
४४ बीड १९ १०४३४२ २८४३
४५ नांदेड २५ ४६७४४ १६२६
४६ नांदेड मनपा १३० ४४३४५ १०३४
लातूर मंडळ एकूण ३४९ ३५६९५७ ९९४१
४७ अकोला २५६४४ ६५५
४८ अकोला मनपा ५४ ३३६३१ ७७३
४९ अमरावती १२ ५२५७४ ९८९
५० अमरावती मनपा १७ ४४०४६ ६०९
५१ यवतमाळ ९४ ७६३१९ १८००
५२ बुलढाणा २३ ८५७७४ ८१२
५३ वाशिम २३ ४१७८० ६३७
अकोला मंडळ एकूण २२७ ३५९७६८ ६२७५
५४ नागपूर ११७ १३०१४८ ३०७५
५५ नागपूर मनपा ८६३ ३६८४२२ ६०५४
५६ वर्धा २० ५७५९२ १२१८
५७ भंडारा १८ ६०२११ ११२४
५८ गोंदिया ८१ ४०८५६ ५७१
५९ चंद्रपूर ५४ ५९६०६ १०८८
६० चंद्रपूर मनपा ४२ २९८७६ ४७८
६१ गडचिरोली १८ ३०६५२ ६६९
नागपूर एकूण १२१३ ७७७३६३ १४२७७
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३३४७० ६९५३५१४ १४१६४७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *