Breaking News

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ: परिक्षार्थींनी व्यक्त केला संताप आरोग्य मंत्री म्हणतात तांत्रिक अडचण आली असेल

मुंबई: प्रतिनिधी

आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सुरु असलेली गोंधळाची परिस्थिती परिक्षेच्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे अनेक परिक्षार्थींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेक परिक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारला या त्रासाचे कारणीभूत ठरविले.

भरती प्रक्रियेसाठी न्याया कम्युनिकेशनला काम दिल्यापासून अर्ज भरलेल्या परिक्षार्थींना त्यांनी मागितलेल्या केंद्राऐवजी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील परिक्षा केंद्रे दिल्याने आधीच अनेक परिक्षार्थींना मनस्ताप सोसावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाने या केलेल्या चुका सुधारण्यासाठी न्याया कम्युनिकेशन कंपनीला संधी दिली. तरीही या कंपनीकडून चुकांची पुन:रावृत्ती कायम सुरुच राहीली.

परिक्षेच्या दिवशी परिक्षार्थींना अडचणी येवू नये यासाठी आरोग्य विभागाच्या सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी ८ उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पथक तयार करून त्यांना प्रत्येक परिक्षा केंद्रावर जाण्यास सांगितले.

परंतु आज लेखी परिक्षेचा दिवस असूनही राज्यातील बहुतांष परिक्षा केंद्रावर वेळेत परिक्षार्थींना केंद्रात प्रवेश दिला नाही. तर काही ठिकाणी प्रवेश देवूनही एक एक तास प्रश्न पत्रिकाच परिक्षार्थींना दिली नाही. तसेच उशीरा प्रश्न पत्रिका देवूनही विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही.

या पध्दतीचे चित्र मुंबई, पुणे, नाशिक येथील आरोग्य विभागाच्या परीक्षेत चित्र पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचं समोर आलंय. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ झाला आहे. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थांना आसन क्रमांक न मिळाल्याचा आरोप करत विद्यार्थांनी गोंधळ घातला. परीक्षा केंद्रांवर सर्व अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. नाशिकमध्ये निम्म्या विद्यार्थांना पेपरच मिळालेच नसल्याचं समोर आलंय.

दरम्यान, या झालेल्या प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले की, काही ठिकाणी दिलेल्या डिजीटल प्रश्नपत्रिकेच्या लॉकला तांत्रिक अडचण आल्यानं थोडा उशीर झाला, ही वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येईल, परीक्षेसाठी केवळ ५ ते १० मिनिटं उशीर झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यानुसार, तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून देण्यात येईल.

दरम्यान काही ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असल्याचे काहीजण विद्यार्थ्याबरोबर हुज्जत घालून त्यांनाच न्यायालयात जा असा निर्वाणीचा इशारा दिल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली.

Check Also

अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई… अन्यथा कधीच बाहेर येणार नाही ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *