Breaking News

एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी

एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.

हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी रेणू सुद कर्नाड म्हणाल्या की, आम्हाला विश्वास आहे की यामुळे घर खरेदीदारांना मदत होईल. गृहनिर्माण हा आजच्या काळात अत्यंत आवश्यक विभाग आहे. वर्षानुवर्षे मालमत्तेच्या किंमती एकतर स्थिर किंवा कमी झाल्या आहेत.

रेणू सुद कर्नाड यांनी सांगितले की, व्याज दर ऐतिहासिकदृष्ट्या कमी पातळीवर आहेत. याशिवाय ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही मिळतो. ग्राहक या गृहकर्जासाठी कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. हे गृहकर्ज त्या ग्राहकांसाठी असेल ज्यांचे क्रेडिट स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

यापूर्वी पगारदार ग्राहकांसाठी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या गृहकर्जावरील व्याजदर ७.१५ टक्के होता. व्यावसायिकांसाठी व्याजदर ७.३० टक्के होता. मात्र, यामध्ये देखील क्रेडिट स्कोअर ८०० असणं बंधनकारक आहे.

गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने पगारदार आणि वेतन नसलेल्या दोन्ही ग्राहकांसाठी गृह कर्जावरील व्याज दर ७.१५ टक्के वरून ६.७० टक्केपर्यंत कमी केलेला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा गृहकर्ज व्याजदर ६.६० टक्के आणि कोटक महिंद्रा बँकेचा ६.५० टक्के आहे.

व्याज दरात कपात केल्याने आगामी दसरा दिवाळी सणात खरेदी दारांकडून गृह कर्जाला मागणी वाढून रिअल इस्टेट बाजार सुधारण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक क्षेत्रात आलेली मरगळ काही प्रमाणात दूर होईल अशी बाजार तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *