Breaking News

एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ

मुंबईः प्रतिनिधी
एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे.
रिलायन्सच्या समभागांना फटका
शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स आणि सौदी अरामकोचा करार रद्द झाल्यामुळे रिलायन्सच्या शेअर्सवर वाईट परिणाम झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवारी ४ टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ७० हजार कोटींनी घटले. NSE वर रिलायन्सचे मार्केट कॅप १४.९९ लाख कोटी रुपये होते.
शेअर बाजारात १८ ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २७४ लाख कोटी रुपये होते. सोमवारी ते २६०.९८ लाख कोटी रुपयांवर आले. म्णजेच एका महिन्यात १३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या कालावधीत जर पेटीएम आणि न्याका सूचीबद्ध झाले नसते तर २ लाख कोटी रुपयांची तूट आली असती. मात्र, महिनाभरात आणखी काही छोट्या कंपन्याही सूचिबद्ध झाल्या आहेत.
टाटा समूह सर्वात मोठा
समूहाच्या दृष्टीने टाटा समूह सर्वात मोठा आहे. त्यांच्या एकूण २९ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २१.९९ लाख कोटी रुपये आहे. १८ ऑक्टोबर रोजी टाटा समूहाचे मार्केट कॅप २३.६९ लाख कोटी रुपये होते. हे मार्केट कॅप १.७० लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे. सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. टीसीएसचे मार्केट कॅप १२.८० लाख कोटी रुपये आहे. समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी टायटन आहे. या कंपनीचे मार्केट कॅप २.२९ लाख कोटी रुपये आहे.
HDFC समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या HDFC समूहाचे एकूण मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपये आहे. १८ ऑक्टोबर रोजी ते १६.३९ लाख कोटी रुपये होते. यामध्ये सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी बँक आहे. बँकेचे मार्केट कॅप १८ ऑक्टोबर रोजी ९.२४ लाख कोटी रुपये होते, जे आता ८.३९ लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये एचडीएफसी लिमिटेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचं मार्केट कॅप ५.२३ लाख कोटी रुपये आहे.
रिलायन्स तिसऱ्या क्रमांकावर
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप २२ नोव्हेंबर रोजी १५.२४ लाख कोटी रुपये आहे. १८ ऑक्टोबर रोजी ते १८.५० लाख कोटी रुपये होते. या समूहाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. त्यांचे मार्केट कॅप १४.९८ लाख कोटी रुपये आहे. ते १८ ऑक्टोबर रोजी ते १७.१६ लाख कोटी रुपये होते.
सोमवारी रिलायन्सचे मार्केट कॅप ७० हजार कोटी रुपयांनी कमी झाले. सौदी अरामकोशी रिलायन्सचा करार अडकला आहे. सौदी आरामकोने सोमवारी सांगितले की, ते भारतात नवीन भागीदार शोधत आहेत. ते येथे गुंतवणुकीच्या संधी पाहत आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्सवर दबाव होता.
टाटा समूहाच्या सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या
शेअर बाजारात सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या टाटा समूहाच्या आहेत. त्याच्या एकूण २९ कंपन्या सूचीबद्ध आहेत. तर रिलायन्सच्या १० कंपन्या आणि HDFC समूहाच्या ५ कंपन्या सूचीबद्ध आहेत. समूहाच्या मार्केट कॅपच्या बाबतीत अदानी समूह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण मार्केट कॅप सुमारे ९ लाख कोटी रुपये आहे. त्यांच्या ६ कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत. आयसीआयसीआय ग्रुपच्याही ४ कंपन्या लिस्टेड आहेत. त्यांचे मार्केट कॅप ७ लाख कोटी रुपयांच्या वर आहे.

Check Also

बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि खाद्य पेये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका

देशात एकाबाजूला आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजत असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *