Breaking News

हाथरसला चाललेल्या राहुल गांधी, प्रियंका गांधीला दिलेल्या पोलिस वागणूकीचे तीव्र पडसाद राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांकडून निषेध

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीवर सामुदायिक बलात्कार करून तिला मारहाण केली. त्यानंतर सदर मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. सदर मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती देण्याऐवजी पोलिस प्रशासनाने परस्पर स्मशानभूमीत नेवून अंत्यसंस्कार केले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या आणि पोलिस प्रशासनाच्या कार्य पध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान सदर मुलीच्यां कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे हाथरसला चालले असता पोलिसांनी त्यांना रस्त्यावरच अडविले. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या झालेल्या धक्काबुकीत ते खाली पडले. पोलिसांनी केलेल्या कृत्याचे पडसाद महाराष्ट्रात तीव्र उमटले.

भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलेली वाईट वागणूक हि निषेधार्थ असून त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच लोकशाहीत हे निंदनीय कृत्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली.

 

Check Also

मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

मुंबई : प्रतिनिधी विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *