Breaking News

व्यायामशाळा आणि केशकर्तनालये पुढच्या आठवड्यापासून सुरू मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख यांनी ही माहिती दिली. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील व्यायायमशाळा व केशकर्तनालये सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सलून व व्यायामशाळा सुरु करण्यासंदर्भातील नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे राज्य शासन आखून देणार आहे. ही नियमावली सर्व व्यायामशाळा व केशकर्तनालये/सलून मालकांसाठी बंधनकारक असेल. जिमला जाणाऱ्यांनी तसेच केस कापण्यासाठी जाणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क वापरणे, सॅनिटायझेशन बंधनकारक आहे. सर्व नियमांचे कडक पालन करूनच प्राथमिकस्तरावर व्यायामशाळा व केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *